शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मिरवणुकीवरील दगडफेकीत दोन पोलीस जखमी

By admin | Updated: August 31, 2014 00:06 IST

विद्युत पुरवठा खंडित झाल्याची संधी साधत काही लोकांनी गणपती मिरवणुकीवर दगडफेक केली. लाकडी फळीने मूर्तीचीही विटंबना करण्यात आली. बंदोबस्तातील दोन पोलीस शिपाई दगडफेकीत जखमी झाले.

उमरखेड शहरातील घटना : मूर्तीची विटंबना, पोलीस अधीक्षक घटनास्थळी, गुन्हे दाखल उमरखेड : विद्युत पुरवठा खंडित झाल्याची संधी साधत काही लोकांनी गणपती मिरवणुकीवर दगडफेक केली. लाकडी फळीने मूर्तीचीही विटंबना करण्यात आली. बंदोबस्तातील दोन पोलीस शिपाई दगडफेकीत जखमी झाले. प्रकरणी परस्परांविरुध्द दाखल तक्रारीवरून दोनही गटांतील काही लोकांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. स्थानिक शिवाजी वार्डातील मित्र गणेश मंडळाचा गणपती स्थापनेसाठी शुक्रवारी आठवडीबाजारातून जात होता. रात्री १० च्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाला. अंधाराचा फायदा घेत दगडफेक करून लाकडी फळीने गणेश मूर्तीची विटंबना केली. या आशयाची तक्रार अक्षय रमेश कोंडुलकर यांनी दिली. यानुसार इनायतुल्ला जनाब, समंदर लाला, मुकद्दर लाला, शरीक लाला, सिकंदर लाला, शहजाद लाला, कलीम उल्हा, लाला सर, फिरोज पठाण, बबलू पानठेलेवाला, गुड्डु पठाण, अक्रम खान, फरहान यांच्यासह ४५ ते ५० लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच शहजाद खान, समंदर खान (रा. रोहिलापुरा) यांच्या तक्रारीवरून अविनाश ठाकूर, विक्की सोनार यांच्यासह ५० ते ७० लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. झालेल्या दगडफेकीत गजानन राठोड आणि दिगंबर मुसळे हे पोलीस शिपाई जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. विटंबना झालेल्या गणेश मूर्तीचे विसर्जन करून नवीन मूर्तीची स्थापना करण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी रात्रीच घटनास्थळाला भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. अधीक्षकांसह अपर पोलीस अधीक्षक जानकीराम डाखोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी पाटील हे परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आहे. सदर घटनेमुळे शहरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी विविध भागात चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान सदर घटनेप्रकरणी काही लोकांवर भादंवि १४७, १४८, १४२, २९५, ३३६, ३२३, ३२४ या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेतील जखमी शिपायांवर उपचार सुरू असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)