शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाख कृषीपंपाच्या वीज जोडण्या खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 11:34 IST

पंतप्रधानांनी कृषी उत्पादन दुप्पट करण्यावर भर दिला आहे. नवीन सरकारमध्येही या धोरणाची अंमलबजावणी होणार असल्याचे केंद्रीय कृषीमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्याकरिता प्रकल्प आणि विहिरींच्या माध्यमातून ओलित करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देट्रान्सफार्मर मिळेनाअतिउच्च दाब वाहिनीचा प्रयोग प्रभावीत

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पंतप्रधानांनी कृषी उत्पादन दुप्पट करण्यावर भर दिला आहे. नवीन सरकारमध्येही या धोरणाची अंमलबजावणी होणार असल्याचे केंद्रीय कृषीमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्याकरिता प्रकल्प आणि विहिरींच्या माध्यमातून ओलित करण्यात येणार आहे. यामुळेच सिंचनासाठी लागणाऱ्या कृषीपंपांना तत्काळ वीज जोडण्या देण्याचे आदेश उर्जामंत्र्यांनी दिले आहे. तरी अद्यापही एक लाख ९३ हजार कृषीपंपांना वीज जोडण्या मिळाल्या नाही. ट्रान्सफार्मरच्या पुरवठ्याविना या जोडण्या खोळंबल्या आहेत.अतिउच्च दाब वाहिन्यांवरून शेतकऱ्यांना थेट विजेचे कनेक्शन देण्याचा निर्णय वीज वितरण कंपनीने घेतला आहे. राज्य शासनाच्या मदतीने महावितरण कंपनी एचव्हीडीएस योजना राबवित आहे. पाच हजार ४८ कोटी रूपयांची ही योजना आहे. यामुळे प्रत्येक शेतकºयासाठी स्वतंत्र डीपी कृषी फिडरच्या क्षेत्रात पाहायला मिळणार आहे. त्या दृष्टीने अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.विदर्भात ५० हजार वीज जोडण्यांचे अर्ज वीज वितरण कंपनीकडे दाखल करण्यात आले आहे. राज्यात कृषीपंपांकरिता दोन लाख १८ हजार शेतकºयांचे अर्ज आले आहेत. या शेतकऱ्यांना वीज जोडणी करण्यासाठी ट्रान्सफार्मर पुरविले जात आहे. मात्र याची संख्या फार कमी आहे. ट्रान्सफार्मर निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे उत्पादन मागणीच्या तुलनेत कमी पडले आहे. यामुळे कृषीपंपांचे वीज कनेक्शन थांबले आहेत. लवकरच ट्रान्सफार्मरचा पुरवठा होईल, असे कंपनीच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.राज्यभरात कृषी ट्रान्सफार्मरचा पुरवठा करण्याचे काम प्रमुख कंपन्यांकडे देण्यात आले आहे. या कंपन्यांनी आतापर्यंत राज्यभरात २५ हजार ट्रान्सफार्मर पुरविले आहेत. येणाऱ्या काळात हे ट्रान्सफार्मर आणखी वाढणार आहेत. तोपर्यंत शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.यवतमाळकडे केवळ ६५० ट्रान्सफार्मरयवतमाळ जिल्ह्यात आठ हजार शेतकऱ्यांनी कृषीपंपाच्या जोडणीसाठी अर्ज केले आहे. प्रत्यक्षात ६५० ट्रान्सफार्मर या ठिकाणी पोहोचले आहेत. पुरवठ्यानुसार वीज जोडण्या करण्यात येत आहे. यानंतरही अनेक शेतकरी जोडणीपासून वंचित आहेत.सौरपंपात विविध अडचणीवीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना सौरपंपाचा प्रस्ताव ठेवला आहे. सोलरपंपामध्ये खोली आणि पाणी ओढताना विविध अडचणी निर्माण होतात. सोलरपंप सुरक्षा आणि त्याच्या दुरूस्तीसाठीही मोठे प्रश्न निर्माण होतील. शिवाय वर्षभरानंतर त्याची कार्यक्षमता कमी होईल. यामुळे विदर्भातील बहुतांश शेतकऱ्यांनी सोलरपंपाच्या मागणीकडे पाठ फिरविल्याचेच चित्र आहे.ऑनलाईन अर्ज थांबण्याचे कारण गुलदस्त्यातजुन्याच वीज जोडण्या प्रलंबित आहेत. यामध्ये नवीन वीज जोडण्यांची भर पडली, तर आकडा मोठा होण्याचा धोका आहे. यामुळे वीज कंपनीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज डाऊनलोडच होत नाही. याबाबत अधिकृतरीत्या कोणीही बोलायला तयार नाही.एचव्हीडीएस योजनेतून दोन लाख १८ हजार अर्ज आले आहेत. यापैकी २५ हजार ट्रान्सफार्मर राज्यात पुरविण्यात आले आहे. यावरून कृषीपंपांच्या २५ हजार जोडण्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.- विश्वास पाठकसंचालक, होल्डींग कंपनी, वीज वितरण

टॅग्स :agricultureशेती