पुसद : अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनसापुरे यांनी स्थापन केलेल्या नाम फाऊंडेशनला येथील शरद मैंद मित्र परिवाराच्यावतीने दोन लाख रुपयांची मदत देण्यात आली. मकरंद अनासपुरे यांंना हा धनादेश पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांच्या हस्ते देण्यात आला. यवतमाळ हा शेतकरी आत्महत्यांनी कुप्रसिद्ध जिल्हा आहे. या जिल्ह्यात खचलेल्या शेतकऱ्यांंना मदत देण्यासाठी नाम फाऊंडेशन उपक्रम राबवित आहे. या फाऊंडेशनला शरद मैंद मित्र परिवाराने दोन लाख रुपयांचा धनादेश दिला आहे. यापूर्वीही मंडळातर्फे एक लाख रुपये नाम संस्थेला देण्यात आले होते. यावेळी शफीक हिराणी, यशवंतराव चौधरी, विकास जामकर, अॅड. भारत जाधव, राजेंद्र भिताडे, अमोल व्हडगिरे, शरद पवार, क्रांती कामारकर आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
‘नाम’ला दोन लाख रुपयांची मदत
By admin | Updated: January 16, 2017 01:08 IST