शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाख क्ंिवटल तूर खरेदीची चौकशी

By admin | Updated: May 23, 2017 01:16 IST

संपूर्ण राज्यात तूर खरेदीचा घोटाळा गाजत असताना यवतमाळ जिल्ह्यात खरेदी झालेल्या दोन लाख क्ंिवटल तुरीचीही चौकशी करण्याचे आदेश...

सहकार विभागाचे आदेश : १५ खरेदी केंद्र संशयाच्या भोवऱ्यात लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संपूर्ण राज्यात तूर खरेदीचा घोटाळा गाजत असताना यवतमाळ जिल्ह्यात खरेदी झालेल्या दोन लाख क्ंिवटल तुरीचीही चौकशी करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १५ ही तूर खरेदी केंद्र संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. राज्यात तूर खरेदीवरून प्रचंड गोंधळ उडालेला आहे. नाफेडच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांचीच तूर खरेदी झाल्याची ओरड होत आहे. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तूर घोटाळ्याला दुजोरा दिला. परिणामी तूर खरेदी मागील वास्तव जाणून घेण्यासाठी तूर खरेदीची चौकशी केली जात आहे. यवतमाळ जिल्ह्यात १५ केंद्रावर २२ एप्रिलपर्यंत दोन लाख क्ंिवटल तुरीची खरेदी झाली. या केंद्रांवर तूर विकताना शेतकऱ्यांना प्रचंड विलंब लागला. टोकन मिळाल्यानंतरही शेतकऱ्यांची तूर खरेदी केली जात नव्हती. तर दुसरीकडे व्यापाऱ्यांची तूर तात्काळ विकत घेतली जात असल्याची ओरड आहे. व्यापाऱ्यांची तूर खरेदी केल्याचा प्रकार नेर येथे चौकशीत पुढे आला. आता याच धर्तीवर जिल्ह्यातील १५ ही केंद्रांची कसून चौकशी केली जाणार आहे.परवानाधारक व्यापाऱ्यांनी तूर विकली आहे का, त्याचे टोकन काढले होते का, किती वेळा तूर विकली याची माहिती गोळा करण्यात येत आहे. यासोबतच २५ क्ंिवटलच्यावर किती शेतकऱ्यांनी तूर विकली, तूर विकताना किती क्षेत्राचा पेरा सातबारावर नोंदविला आहे, तो नियमात बसतो काय याची माहिती जाणून घेतली जाणार आहे. यात काही गैर आढळल्यास सहकारी नियमानुसार संबंधित व्यापाऱ्यांचा परवाना निलंबन आणि फौजदारी कारवाई होणार आहे. अहवालासाठी दुसरे स्मरणपत्र जिल्ह्यातील सर्व केंद्रांना तूर विकणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावाची यादी आणि प्रत्यक्ष खरेदी झालेली तूर याची माहिती देण्याचे आदेश दिले आहे. या ठिकाणी तूर खरेदी करताना यंत्रणा तोकडी पडत आहे. यामुळे अद्यापही या प्रकरणात चौकशी झाली नाही. आता सहकार विभागाने दुसरे स्मरणपत्र दिले आहे. आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. शासकीय तूर खरेदी केंद्रांमध्ये वेगाने तूर मोजण्याची आणि सोबतच चौकशीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अहवाल सात दिवसात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. - अर्चना माळवीप्रभारी, जिल्हा उपनिबंधक, यवतमाळ