शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळात तुटलेल्या पुलामुळे दोन किलोमीटरचा फेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 15:44 IST

Yawatmal News उमरसरा भागात सुरभीनगर येथे दीड महिन्यांपूर्वी एक पूल तुटला. मात्र अद्याप तो त्याच अवस्थेत असल्याने तेथील नागरिकांना शहरात येण्यासाठी दीड ते दोन किलोमीटरचा फेरा सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देउमरसरा येथील नागरिक त्रस्तपूल दुरुस्तीकडे नगरसेवकांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शहरातील उमरसरा भागात सुरभीनगर येथे दीड महिन्यांपूर्वी एक पूल तुटला. मात्र अद्याप तो त्याच अवस्थेत असल्याने तेथील नागरिकांना शहरात येण्यासाठी दीड ते दोन किलोमीटरचा फेरा सहन करावा लागत आहे. त्या भागातील नगरसेवकांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. नगरपरिषदेकडे निधीच नाही तर आम्ही विकास कामे व दुरुस्ती करावी कशी, असा उलट सवाल भाजपचे नगरसेवक दिनेश चिंडाले नागरिकांना विचारत आहेत. विशेष असे, या तुटलेल्या पुलामुळे विकास कामातील निकृष्टताही अधोरेखित झाली आहे.

उमरसरा भागातील सुरभीनगरात जाण्यासाठी नाल्यावर दोन बाजूने दोन पूल बांधण्यात आले आहे. बारा ते पंधरा वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आलेल्यापैकी एक पूल दीड महिन्यांपूर्वी ट्रकच्या वाहतुकीत खचला, तर दुसरा पूल दोन वर्षांपासून वाहतुकीसाठी बंद होता. या पूलाचा एक भाग खचला होता. पुलाला मध्यभागी मोठे छिद्र पडले होते. आता दोनही पूल बंद आहे. यामुळे एक ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा रस्ताच नाही. पायदळ जाण्यासाठी तुटलेल्या पुलावरून कसरत करावी लागते. यातून या भागात दररोज अपघात होत आहे.

दुचाकी, चारचाकी व इतर वाहने याठिकाणावरून काढता येत नाही. त्याकरिता दीड ते दोन किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. यामुळे आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक यांना बाहेर जाताना हा वळसा केल्यानंतर बाहेर पडता येते. याठिकाणी घंटागाडी, भाजीपाला अथवा कुठलाही आॅटोरिक्षा प्रवेश करत नाही. या संदर्भात या भागातील नागरिकांनी नगरसेवकांकडे तक्रार केली. मात्र नगरपालिकेकडे हा विषय सभागृहात मांडला गेला नाही. त्यांच्याकडे या कामासाठी निधी नाही. यामुळे हा प्रश्न अजूनही तसाच आहे. या भागातील दुसऱ्या पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र हे काम अपूर्ण आहे.नगरसेवक फिरकलेच नाहीआमच्या भागात रस्ता खचल्यानंतर नगरसेवक फिरकलेच नाही. नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जात नाही, अशी खंत या भागातील नंदा पाटील, उषा क्षीरसागर, पुष्पा राऊत, हनुमंत अंभोरे यांनी व्यक्त केली.नगरपालिकेकडे रस्त्यासाठी निधी उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत विविध ठिकाणावरून तरतूद करीत पुुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. दुसऱ्या पुलासाठी प्रयत्न केला जात आहे.- दिनेश चिंडाले, नगरसेवक

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक