शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या दोन स्वतंत्र याद्या

By admin | Updated: August 29, 2014 00:06 IST

जिल्ह्यात यवतमाळ विधानसभा मतदारसंघावर सर्वाधिक लक्ष केंद्रीत केले जात असून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र यादी तयार केल्याची माहिती आहे.

यवतमाळ विधानसभा मतदारसंघ : मराठा उमेदवारावर भर यवतमाळ : जिल्ह्यात यवतमाळ विधानसभा मतदारसंघावर सर्वाधिक लक्ष केंद्रीत केले जात असून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र यादी तयार केल्याची माहिती आहे. जिल्ह्यात विधानसभेचे सात मतदारसंघ आहेत. त्यापैकी सहा जागांवर काँग्रेसचा तर पुसदच्या एकमेव जागेवर राष्ट्रवादीचा दावा आहे. यावेळी मात्र पक्षाची ताकद वाढल्याचे सांगत राष्ट्रवादीने दिग्रस, उमरखेड व यवतमाळ या वाढीव मतदारसंघांची मागणी केली आहे. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी थेट शरद पवारांची भेट घेऊन यवतमाळ मतदारसंघासाठी दबाव वाढविला आहे. तर दुसरीकडे यवतमाळ विधानसभा मतदारसंघाची चर्चा मुंबईपर्यंत आहे. कारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांनी मुलगा राहुलसाठी या मतदारसंघावर दावा सांगितला आहे. त्यामुळेच या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रदेशाध्यक्षांप्रमाणे मुख्यमंत्र्यांनीही यवतमाळ मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला आहे. दोघांनीही उमेदवारांच्या स्वतंत्र याद्या बनविल्याची माहिती आहे. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या यादीत मुलगा राहुल ठाकरे आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे या दोनच नावांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. राहुल ठाकरेंचे नाव समाविष्ठ करण्यामागे मराठा समाजाला प्रतिनिधीत्व देणे हे कारण पुढे केले जात आहे. तर नरेंद्र मोदींमुळे तेली समाज बांधवांचा कल भाजपाकडे असल्याने त्यांना काँग्रेसकडे वळविण्यासाठी संध्याताई सव्वालाखे यांचा समावेश या यादीत केल्याचा युक्तीवाद आहे. मुख्यमंत्र्यांनीही आपल्या यादीत मराठा आणि अल्पसंख्यक असा समन्वय साधला आहे. त्यांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर माजी खासदार उत्तमराव पाटील यांचे बंधू जीवन पाटील यांचे नाव आहे. दुसऱ्या क्रमांकावर यवतमाळच्या विद्यमान आमदार नंदिनी पारवेकर यांना स्थान देण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्षांनी नंदिनी पारवेकरांचा पत्ता कापला असला तरी मुख्यमंत्र्यांनी मात्र आपल्या यादीत त्यांना जीवन पाटलांचा पर्याय म्हणून कायम ठेवल्याने महिला वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. या उलट नंदिनी पारवेकरांचे नाव यादीत समाविष्ठ केले नाही म्हणून प्रदेशाध्यक्षांविरोधात महिलांमध्ये रोष आहे. प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्र्यांकडून रस्सीखेच सुरू असल्याने यवतमाळ विधानसभा मतदारसंघाची काँग्रेसची उमेदवारी नेमकी कोणाला मिळते याकडे लक्ष लागले आहे. भाजपानेही या मतदारसंघात मराठा उमेदवार देण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालविले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी) मोघे, पुरके, खडसेंची लागणार कसोटी वणी, राळेगाव, आर्णी व उमरखेड हे चार मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहेत. वणी व राळेगाव या दोन मतदारसंघात आपल्याशिवाय दुसरा कुणी दावेदार तयार होणार नाही याची खबरदारी विद्यमान आमदारांनी घेतली आहे. पक्षात तेथे नवे नेतृत्वच गेल्या कित्येक वर्षात तयार होऊ दिले गेले नाही, अशी टीका काँग्रेसमधूनच ऐकायला मिळत आहे. आर्णीमध्ये काँग्रेसच्या उमेदवारीसाठी शिवाजीराव मोघेंपुढे एका सेवानिवृत्त आयपीएस अधिकाऱ्याने आव्हान उभे केले आहे. आर्णी-केळापूरचे आमदार शिवाजीराव मोघे आणि राळेगावचे आमदार वसंत पुरके यांच्या विरोधात त्यांच्या मतदारसंघातील तीनही तालुक्यात मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ही नाराजी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाला मिळालेल्या मताधिक्यावरून सिद्ध होते. विधानसभेत काँग्रेससाठी या पेक्षा आणखी गंभीर स्थिती राहण्याची शक्यता राजकीय गोटात वर्तविली जात आहे. उमरखेडमध्ये विद्यमान काँग्रेस आमदार विजय खडसेंविरोधात नाराजी आहे. त्यामुळे पक्षातूनच अनेक जण तेथे इच्छुक आहेत. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसनेसुद्धा या मतदारसंघावर दावा सांगितला आहे. वणीमध्ये कुणबी समाज आणि विरोधी पक्षातील तोडफोड ही काँग्रेससाठी नेहमीच जमेची बाजू राहिली आहे. त्यासाठी अनेक उमेदवार काँग्रेसच्या इशाऱ्यावर उभे केले जातात. यावेळी मात्र कुणबी समाज आणि सामान्य मतदार जागरुक झाल्याने मतांची विभागणी टाळण्यावर भर राहणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वामनराव कासावारांचे मत विभाजनाद्वारे निवडून येण्याचे स्वप्न भंगण्याची चिन्हे दिसू लागली आहे. दिग्रस-दारव्हा मतदार संघात प्रदेशाध्यक्ष शिवसेनेच्या तोंडी कुणाला देतात, याकडे नजरा लागल्या आहेत. तेथे काँग्रेसकडे बहूतांश उमेदवार बंजारा समाजाचेच आहेत. त्यातून कुणाचा बळीसाठी नंबर लावला जातो हे वेळच सांगेल. शिवसेनेच्या धास्तीने ठाकरे पिता-पुत्राने दिग्रस हे आपले घरचे मैदान केव्हाच सोडले आहे, हे विशेष! त्यांनी आता यवतमाळच्या मैदानावर राजकीय सराव सुरू केला आहे.