शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

अमराईत दोन घरे फोडून साडेतीन लाख लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2016 01:11 IST

वडगाव रोड पोलीस ठाण्यामागील साडेसात लाखांच्या चोरीची घटना ताजी असतानाच वडगाव परिसरातील अमराई भागात रात्री चोरट्यांनी एकाच वेळी दोन घरे फोडली.

 डिटेक्शनचा पत्ता नाही : चोऱ्यांचे सत्र थांबेना यवतमाळ : वडगाव रोड पोलीस ठाण्यामागील साडेसात लाखांच्या चोरीची घटना ताजी असतानाच वडगाव परिसरातील अमराई भागात रात्री चोरट्यांनी एकाच वेळी दोन घरे फोडली. तेथून सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज लंपास केला. सतत सुरू असलेले चोऱ्यांचे हे सत्र आणि पोलिसांचे डिटेक्शन (गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण) जेमतेम असल्याने यवतमाळकर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिजवे नगरातील सेवानिवृत्त वीज कर्मचारी योगेश्वर रामचंद्र रोडे व त्यांच्या घरासमोरील कृषी विभागाच्या कर्मचारी मधुश्री मनोज मसराम यांच्या घरी चोरीची ही घटना घडली. दोन्ही घरात चोरट्यांनी बेडरूमच्या खिडकीची ग्रील काढून प्रवेश केला. कुटुंबिय चोंढी येथे नातेवाईकांकडे गेल्यामुळे योगेश्वर रोडे घरी एकटेच होते. रात्री दोननंतर चोरट्यांनी खिडकीची ग्रिल काढून बेडरूमध्ये प्रवेश केला. त्यासाठी अंगणातील लोखंडी पलंग खिडकीपर्यंत आणून त्याचा शिडी म्हणून उपयोग केला. त्यांनी सर्वप्रथम हॉलमधील दोन मोबार्र्ईल ताब्यात घेतले. नंतर बेडरूमच्या कपाटातील तीन तोळ्यांची कंठी-पोत, घड्याळ व पाच ते सात हजार रुपये रोख असा सुमारे दीड लाखांचा ऐवज लांबविला. अशाचप्रकारची चोरी समोरच राहणाऱ्या मधुश्री मनोज मसराम यांच्याकडे झाली. त्या दोन मुलींसह झोपल्या होत्या. दुसऱ्या बेडरूमध्ये चोरट्यांनी खिडकीची ग्रिल काढून प्रवेश केला. दोन मोबाईल, कपाटातील कानातील नऊ ग्रॅमचे तीन जोड, ३५ ग्रॅमची पोत, सात ग्रॅमच्या दोन अंगठ्या व काही रोख असा जवळपास दीड लाखांचा ऐवज चोरून नेला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. ठसेतज्ज्ञ व श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. श्वान मात्र घुटमळले. (प्रतिनिधी) फिर्यादी महिलेलाच आठ तास ताटकळत ठेवले ! घरी चोरी झाल्याचे लक्षात येताच मधुश्री मसराम ह्या प्रचंड घाबरल्या. त्यांच्याकडे त्यावेळी कुणीही पुरुष नसल्यामुळे त्या स्वत:च दोन मुलींना घरी ठेवून पहाटे सहा वाजताच वडगाव रोड पोलीस ठाण्यात पोहचल्या. त्या ठिकाणी त्यांना दुपारी दोनपर्यंत बसवून ठेवण्यात आले. ब्रश न करता, चहा न पिताच त्या दोन वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात होत्या. त्यानंतर त्यांना पुन्हा चार वाजता पोलिसांनी बोलविले असल्याचे त्यांनी प्रस्तूत प्रतिनिधीला सांगितले. फिर्याद देण्यासाठी गेलेल्या महिलेला ‘प्रोसेसच्या नावाखाली’ आठ तास बसवून ठेवण्याचा प्रकार प्रचंड संताप आणणारा आहे. नागरिकांनी चोरी, घरफोडीच्या घटनेची फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यापर्यंत येऊच नये असा संदेश तर पोलिसांना यातून द्यायचा नाही ना अशी शंका येऊ लागली आहे. पोलिसांकडून फिर्यादीलाच आरोपी सारखी ट्रिटमेंट मिळत असेल तर तक्रार नोंदवायला पुढे येणार कोण असा प्रश्न उपस्थित होतो आहे.