शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
3
Raigad Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
4
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
5
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
6
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
7
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
8
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
9
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
10
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
11
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेस; पाकिस्तानला लागणार मिरची..!
12
सरकार बदलणार MRP चा फॉर्म्युला; वस्तूंच्या किंमती कमी होणार की महागणार? ग्राहकांवर होणार परिणाम
13
धक्कादायक! हरवलेला क्रिकेटचा बॉल शोधत होता, बंद घरात मानवी सांगाडा पाहून हादरला
14
Video - जीवघेणा प्रवास! शाळेत जाण्यासाठी चिमुकलीची धडपड; पाय घसरून चिखलात पडली अन्...
15
व्रत-वैकल्यांचा राजा श्रावणमास, प्रत्येक दिवसाचे महत्त्व खास; पाहा, सण-उत्सवांचे महात्म्य
16
वय ३५? काळजी करू नका! 'या' ३ सोप्या स्टेप्सने कमवू शकता १ कोटीचा फंड, गुंतवणुकीचा सिक्रेट रोडमॅप!
17
WI vs AUS: अब्रूचं खोबरं! कॅरेबियन संघ २७ धावांवर ऑल आउट! ७ फलंदाजांच्या पदरी पडला भोपळा
18
Video: पॅराग्लायडिंग करण्यासाठी 'तो' धावत गेला अन् दरीत कोसळला! व्हिडीओ बघून चुकेल काळजाचा ठोका
19
मुंबई: घरातील सगळे झोपले अन् वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने आयुष्य संपवले, साडीनेच घेतला...
20
१३८ दिवस शनि वक्री: ५ राशींवर शनिची वक्र दृष्टी कायम, ‘हे’ रामबाण उपाय कराच; शनि शुभ करेल!

पुसद शहरात दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड

By admin | Updated: July 4, 2016 02:11 IST

पुसद शरासह तालुक्यात दुचाकी चोरून उच्छाद मांडणाऱ्या चोरट्यांची टोळी गजाआड करण्यात पोलिसांना यश आले.

तिघांना अटक : अनेक चोरींचा छडा लागणारपुसद : पुसद शरासह तालुक्यात दुचाकी चोरून उच्छाद मांडणाऱ्या चोरट्यांची टोळी गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. पुसद पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्याजवळून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे. पुसद शहरात गत काही दिवसांपासून दिवसाढवळ्या दुचाकी लंपास होत होत्या. यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. पोलिसांनी या टोळीचा छडा लावण्यासाठी गुप्त माहिती मिळविणे सुरू केले. ठाणेदार गजानन शेळके यांनी एक विशेष पथक तयार केले या पथकात जमादार वसंत चव्हाण, मुन्ना आडे, माधव आत्राम, महंमद गदर शेख, प्रसन्नजित भवरे, अभिषेक इंगळे यांचा समावेश आहे. या पथकाने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनात गोपनीय माहितीवरून टोळी गजाआड केली. त्यात पांडुरंग अमृतराव श्रीनाथ (२२) रा. भगतसिंग वार्ड उमरखेड, शेख फिरोज उर्फ पटेल शेख मुस्तफा (३०) रा. रहीमनगर उमरखेड, शेख वसीम शेख अमजदतुल्ला (३२) रा. आझाद चौक हदगाव जि. नांदेड यांना अटक केली. या चोरट्यांनी पुसद शहर, वसंतनगर, दिग्रस, कळमनुरी परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. दुचाकी चोरीची असल्याचा सुगावा लागू नये म्हणून नंबर प्लेट बदलविण्यात आली होती. त्यांच्याकडून पाच दुचाकी हस्तगत केल्या. आणखी दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)पोलिसांनी जप्त केल्या पाच दुचाकी पोलिसांनी चोरट्यांकडून पाच दुचाकी जप्त केल्या. त्यात पुसद येथील मोतीनगरातील प्रतीक सुरेश मांडवगडे यांची दुचाकी क्र.एम.एच.२९-एएफ-६१५, निलेश विठ्ठलराव वासकर रा. विठ्ठलनगर दिग्रस यांची दुचाकी क्र. एम.एच.२९-एएफ-८९१, शेख चाँद शेख सुलेमान रा. मोमीनपुरा पुसद यांची दुचाकी क्र.एम.एच.२९-एसी-६४८४, शुभम सुनील भागणे रा. माळीगल्ली कळमनुरी यांची दुचाकी क्र.एम.एच-३८-६६९३, शेख रसूल शेख नादीम रा. जमजम कॉलनी परभणी यांची दुचाकी क्र.एम.एच.२२-एई-७३०५ पोलिसांनी जप्त केल्या आहे. आणखी दुचाकी जप्त होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली.