शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतरमध्ये काश्मीरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हटला...
2
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
3
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित
4
मुंबई एअरपोर्टवरुन प्रवास करणाऱ्यांना आता अधिक खर्च करावा लागणार; 'या' शुल्कात मोठी वाढ, किती पैसे द्यावे लागणार?
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
6
SBI मध्ये ₹५ लाख जमा केल्यावर मिळेल ₹२ लाखांपेक्षा अधिक व्याज; पाहा १,२,३ आणि ५ वर्षांचं कॅलक्युलेशन
7
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
8
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
9
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
10
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
11
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
12
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
13
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
14
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
15
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
16
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
17
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
18
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
19
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
20
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान

दोन कोटींची डाळ रेशन दुकानदारांच्या माथी

By admin | Updated: September 9, 2016 02:42 IST

स्वस्त धान्य दुकानातील कुठलीही वस्तू स्वस्तात मिळते, हा आजपर्यंतचा अनुभव. पण डाळीच्या बाबतीत या उलट स्थिती आहे.

कमी दराचा प्रस्ताव धूळखात : अडीच लाख ग्राहकांचा दुकानदारांना शोध रूपेश उत्तरवार  यवतमाळस्वस्त धान्य दुकानातील कुठलीही वस्तू स्वस्तात मिळते, हा आजपर्यंतचा अनुभव. पण डाळीच्या बाबतीत या उलट स्थिती आहे. खुल्या बाजारात स्वस्त आणि रेशन दुकानात डाळ महाग आहे. या डाळीची उचल कुठलाही कार्डधारक करत नसल्याने परवानाधारकांना सुमारे दोन कोटी रुपयांची डाळ विकायची कुठे याची चिंता लागली आहे. यातूनच अडीच लाख ग्राहकांचा शोध घेतला जात आहे.खुल्या बाजारात ९० रुपये किलो असलेली डाळ स्वस्तधान्य दुकानात १०३ रुपये किलो आहे. यामध्ये किलोमागे १३ रुपये गरीब ग्राहकांना जास्त द्यावे लागणार आहे. निर्माण झालेले नवीन संकट टाळण्यासाठी पुरवठा विभागाने दर कमी करण्याचा प्रस्ताव उपायुक्तांकडे ठेवला. डाळीचा पुरवठा झालेल्या जिल्ह्यांकडून याबाबत शासनाकडे प्रस्ताव येत आहे. आलेल्या प्रस्तावानंतरही मंत्रिमंडळाने महाग डाळ स्वस्त करण्याचा निर्णय घेतला नाही. यातुन सनाच्या तोंडावर डाळीचा गुंता अधिकच वाढला आहे.स्वस्तधान्य दुकानदारांना १०२ रुपये ३० पैसे किलो दराने डाळ वितरित करण्यात आली. ग्राहकांना ही डाळ १०३ रूपये किलो दराने विकायची आहे. यामध्ये विक्रेत्याला किलो मागे ७० पैसे मिळणार आहे. यानुसार दोन लाख ४७ हजार दारिद्र्यरेषेखालील कुटुंबासह अंत्योदय योजनेतील ग्राहकांना ही डाळ वितरित करण्यात येणार आहे. यामध्ये एक लाख ४७ हजार दारिद्र्यरेषेखालचे कार्डधारक तर, एक लाख अंत्योदय कार्डधारक आहे. या कार्डधारकांसाठी दोन हजार ६६९ क्विंटल डाळ वितरित करण्यात आली. डाळ घेण्यास ग्राहक तयार नसतील तर दुकानातील डाळ शासनाला परत पाठविता येत नाही. तशी व्यवस्थेत तरतूद नाही. यामुळे दोन कोटींचे नुकसान विक्रेत्यांना सहन करावे लागणार आहे.स्वस्त दराच्या नावाखाली लूटण्याचे धोरणबाजारात महागाई कमी करण्याच्या नावाखाली स्वस्त दरात डाळ पुरविली जात असल्याचा कांगावा सरकारने केला. प्रत्यक्षात स्वस्त डाळ उपलब्ध असताना महागडी डाळ दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठी थोपविण्यात आली. यामुळे सरकार गोरगरिबांना लुटायला निघाले आहे. सरकारचे धोरणच गरिबांसाठी असल्याचा आरोप डाळ खरेदी करणारे ग्राहक करीत आहेत.दोन कोटी वसुल करायचे कसेयवतमाळ २७० क्विंटल, कळंब १५०, बाभूळगाव १११, आर्णी १६०, केळापूर २१२, घाटंजी १४५, राळेगाव १३५, वणी १३५, मारेगाव १००, झरी जामणी १२५, पुसद ३००, उमरखेड १७५, महागाव १९०, दारव्हा १९०, नेर १११ तर दिग्रस तालुक्याला १५० क्विंटल डाळीचे वितरण करण्यात आले. महागडया दराने ही डाळ घेण्यास ग्राहकांनी नकार दिला आहे. साधारणत: एका विक्रेत्याला ४० ते ५० हजार रुपयांचे नुकसान या माध्यमातून सहन करावे लागत आहे.