शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

गुजरात, मुंबईला दररोज दोन कोटींचा ‘हवाला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 21:23 IST

कोट्यवधी रुपयांची अवैध सावकारी चालणाऱ्या यवतमाळातून आता हवाला मार्गे मुंबई व गुजरातमध्ये दरदिवशी किमान दोन कोटी रुपये पाठविले जात असल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देराजकीय पदाधिकाऱ्याची ‘दुकानदारी’ : पोलीस, प्राप्तीकर मेहेरबान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोट्यवधी रुपयांची अवैध सावकारी चालणाऱ्या यवतमाळातून आता हवाला मार्गे मुंबई व गुजरातमध्ये दरदिवशी किमान दोन कोटी रुपये पाठविले जात असल्याची खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात हवाला सुरू असताना पोलीस, प्राप्तीकर विभाग गप्प कसा, याचे रहस्य कायम आहे.यवतमाळ जिल्ह्यात कुरिअर सर्विसच्या आड हवाला चालत असल्याची बाब सर्वश्रृत आहे. यवतमाळ शहरात प्रमुख एक-दोन नावे याबाबत नेहमीच चर्चेत राहतात. मध्यंतरी रक्कम लुटण्याच्या घटना घडल्याने यातील एक नाव पोलीस रेकॉर्डवरही आले आहे. परंतु आता कुरिअरच्या आडोशाने नव्हे, तर थेट हवालाचीच दुकानदारी यवतमाळात सुरू झाली आहे. या दुकानातून केवळ आणि केवळ हवालाचाच कारभार चालतो. यवतमाळमधून मुंबई आणि गुजरातमधील विविध प्रमुख शहरांसाठी दरदिवशी किमान दोन कोटी रुपयांची रोकड हवालाद्वारे पाठविली जाते. एकेकाळी यवतमाळ नगरपरिषदेची सूत्रे सांभाळणाऱ्या एका राजकीय पदाधिकाऱ्याची ही ‘दुकानदारी’ असल्याची माहिती आहे. राजकीय संबंधाच्या बळावर पोलिसांचे ‘कन्सेन्ट’ घेऊनच हवालाचा हा कारभार त्या पदाधिकाऱ्याने सुरू केला. पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष बघता हवालातील लाभाचे पाट त्यांच्यापर्यंतही वाहात असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे.एरवी छुटपुट चुकांसाठी रस्त्यावरील हॉकर्स-फेरीवाल्यांना, वाहनधारकांना बाजीराव दाखविणाऱ्या संबंधित पोलिसांनी या हवाला व्यापाऱ्यांपुढे नांग्या टाकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मुंबई शहरातून हिरे व्यापाºयांचा दरदिवशी हजारो कोटींचा हवाला गुजरातमध्ये चालतो.हिरे व्यापाºयांच्या धर्तीवर हवालात्याच धर्तीवर आता यवतमाळातही मुंबई, गुजरातसाठी दरदिवशी किमान दोन कोटींचा हवाला सुरू झाला आहे. मात्र पोलीस व प्राप्तीकर खात्याची यंत्रणा या हवाला उलाढालीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने या हवाला व्यापाऱ्यांवर कारवाई करावी कुणी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, कारवाईचे अधिकार असलेली शासकीय यंत्रणाच या हवाला व्यापाºयाच्या दावणीला बांधली गेली आहे.