शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दोन कोटींच्या वन निविदा अखेर रद्द

By admin | Updated: May 23, 2017 01:23 IST

संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पुसद वन विभागातील दोन कोटी रुपयांच्या निविदा अखेर रद्द करण्यात आल्या आहेत.

पुसद विभाग : नव्याने प्रक्रिया राबविणारलोकमत न्यूज नेटवर्कपुसद : संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पुसद वन विभागातील दोन कोटी रुपयांच्या निविदा अखेर रद्द करण्यात आल्या आहेत. या निविदांसाठी आता नव्याने प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे वन प्रशासनाने ‘लोकमत’ला सांगितले.पुसद वन विभागांतर्गत वनतळे, ढाळीचे बांध, बंधारे, सीसीटी आदींची शेकडो कामे काढण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरुन या कामांच्या तीन लाखांच्या असूनही आॅनलाईन निविदा काढण्यात आल्या. या माध्यमातून तीन लाखांच्या आतील कामे मॅनेज करण्याचा वन अधिकारी व कंत्राटदारांच्या संगनमताने रचलेला डाव जिल्हाधिकाऱ्यांनी उधळला. त्यामुळे आॅनलाईन प्रक्रिया राबविली गेली. परंतु निविदा उघडण्यापूर्वीच कंत्राटदारांनी भरलेल्या डिमांड ड्राफ्टवरून निविदा जादा दराची की कमी दराची याचा अंदाज घेऊन या मॅनेज करण्यात आल्या. मर्जीतील कंत्राटदारांना ही कामे दिली जाणार होती. त्यासाठी वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली. ‘लोकमत’ने या मॅनेज निविदांचा पर्दाफाश करताच वन विभागात सारवासारव सुरू झाली. वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना अंधारात ठेऊन वन परिक्षेत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने निविदा मॅनेजचा कारभार सुरू होता. अखेर दोन कोटी रुपयांच्या या निविदा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यासाठी आता नव्याने निविदा प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे वन प्रशासनाने स्पष्ट केले. दोन कोटींच्या मॅनेज निविदा रद्द झाल्याने वन अधिकाऱ्यांचे ‘गणित’ बिघडले. त्यातूनच वन अधिकारी एकमेकांवर दोषारोपण करीत आहे. त्यातही पुसद डीएफओ कार्यालयाची यंत्रणा व तेथील वन अधिकाऱ्यांवर अन्य आरएफओंचा रोष पहायला मिळतो आहे. जुन्या दोन कोटींच्या निविदा मॅनेज करून आणखी दोन कोटींची कामे काढण्याचा वन अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मनसुबा होता. मात्र तो उधळला गेला. बारामतीतून मजुरांची आयात पुसद वन विभागात आणि विशेषत: वनपरिक्षेत्रात गेल्या काही वर्षात तीन लाखांच्या आतील मोठ्या प्रमाणात कामे जंगलांमध्ये करण्यात आली. या कामांचे कंत्राट कागदोपत्री स्थानिकांच्या नावे दिसत असले तरी प्रत्यक्षात वन अधिकाऱ्यांनीच ठेकेदाराची भूमिका वठविली. त्यासाठी खास पुणे जिल्ह्यातील बारामतीतून मजुरांची आयात केली गेली. पुसदमधील प्रशासनावर बारामतीचे राजकीय वजनही वापरण्याचा प्रयत्न वन अधिकाऱ्यांनी केल्याचे सांगितले जाते. दिग्रस व अन्य वन परिक्षेत्रातसुद्धा तीन लाखांच्या आतील कामांचा असाच प्रचंड घोळ आहे. यावेळी पुन्हा हा घोळ घातला जाणार होता. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी ऐनवेळी तीन लाखांच्या आतील सर्व कामे आॅनलाईन करण्याचे निर्देश दिल्याने व नंतर आॅनलाईन निविदा मॅनेजचा भंडाफोड झाल्याने संभाव्य घोळाचा डाव उधळला गेला. पुसद विभागातील जलसंधारण आणि वनीकरणाशी संंबंधित गेल्या काही वर्षातील तमाम कामांची एखाद्या प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यामार्फत चौकशी झाल्यास मोठे घबाड उघड होण्यास वेळ लागणार नाही. मात्र चौकशीसाठी एवढा प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी वन विभागात शोधण्याचे आव्हानच आहे.