शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
2
सिंगापूरमधील एका हॉटेलमध्ये दोन सेक्स वर्करना बोलावले, रुममध्ये येताच दागिने, पैसे चोरले; दोन भारतीयांना शिक्षा सुनावली
3
या राज्यात धोकादायक कफ सिरपवरही बंदी; मुलांच्या मृत्यूनंतर लगेच कारवाई
4
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
5
शिंदेसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला; एक आरोपी ताब्यात
6
टॅलेंट नाही, खरी समस्या 'इकडे' आहे... चीनपेक्षा इथे भारत पाच पट मागे का? पै यांनी सांगितलं खरं कारण
7
फाटलेले कपडे, चेहऱ्यावर भीती...अभिनेत्री डिंपलच्या पतीनं मोलकरणीसोबत फ्लॅटमध्ये असं काय केले?
8
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि ज्यू सैन्यावरही परिणाम
9
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
10
कोजागरी पौर्णिमा २०२५: कोजागरी ते लक्ष्मीपूजन, आर्थिक वृद्धीसाठी सलग १५ दिवस म्हणा 'हे' लक्ष्मी मंत्र!
11
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
12
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
13
Tarot Card: येत्या आठवड्यात प्रवास योग आणि आप्तेष्टांच्या भेटी सुखावतील; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
14
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
15
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
16
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
17
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
18
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
19
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
20
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा

दोन अस्वलांचा विहिरीत पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 06:00 IST

कोठारी शिवारातील शिवा संभा आढागळे यांच्या शेतातील विहिरीमध्ये दोन नर जातीचे अस्वल मृतावस्थेत आढळले. या घटनेची माहिती कोठारीचे पोलीस पाटील किसन नांदे यांनी वन विभागाला दिली. उपविभागीय वनअधिकारी अमोल थोरात व वनपरिक्षेत्र अधिकारी हेमंत उबाळे आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विहिरीत खाट सोडून दोन्ही अस्वलांचे मृतदेह बाहेर काढले. घटनेचा पंचनामा केला.

लोकमत न्यूज नेटवर्कबिजोरा : महागाव तालुक्यातील कोठारी शिवारातील विहिरीमध्ये पडून दोन अस्वलांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान निदर्शनास आली.कोठारी शिवारातील शिवा संभा आढागळे यांच्या शेतातील विहिरीमध्ये दोन नर जातीचे अस्वल मृतावस्थेत आढळले. या घटनेची माहिती कोठारीचे पोलीस पाटील किसन नांदे यांनी वन विभागाला दिली. उपविभागीय वनअधिकारी अमोल थोरात व वनपरिक्षेत्र अधिकारी हेमंत उबाळे आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विहिरीत खाट सोडून दोन्ही अस्वलांचे मृतदेह बाहेर काढले. घटनेचा पंचनामा केला. घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.येवतीकर व डॉ.वाय.एस. पाटील यांना पाचारण करून अस्वलांच्या मृतदेहाची उत्तरिय तपासणी करण्यात आला.दोन्ही अस्वलांचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. सदर विहीर जमीन लेव्हलला आहे. तसेच सभोवताल गवत वाढले आहे. त्यामुळे दोन्ही अस्वल विहिरीत पडल्याचा कयास वर्तविला जात आहे. उत्तरिय तपासणीनंतर दोन्ही अस्वलांचे डॉक्टर व वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसमक्ष दहन करण्यात आले.घटनास्थळी कोणत्याही प्रकारे वीज प्रवाह किंवा विषाचा प्रयोग झाल्याचे आढळले नाही. मात्र खरे कारण शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कळणार आहे. दरम्यान, यवतमाळ येथील मानव वन्यजीव कोबरा अ‍ॅडव्हेंचरची चमूसुद्धा आली होती. वन विभागाचे बी. ए. खान, क्षेत्र सहायक एस.एम. हक, एस.एम. राठोड, डी.व्ही. गावंडे, वनपाल व इतर वनकर्मचाºयांसह नागरिकांनी अस्वलांचे मृतदेह बाहेर काढण्यास सहकार्य केले. घटनास्थळाला उमरखेड उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांनी भेट दिली.

टॅग्स :forest departmentवनविभाग