शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

अडीच कोटींचा सफाई कंत्राट गाजला

By admin | Updated: December 3, 2014 22:57 IST

यवतमाळ नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा अडीच कोटींच्या सफाई कंत्राटावरुन चांगलीच गाजली. या न्यायप्रविष्ठ प्रकरणात मुख्याधिकाऱ्यांनी काही एक मत व्यक्त करण्यास नकार दिल्याने

यवतमाळ : यवतमाळ नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा अडीच कोटींच्या सफाई कंत्राटावरुन चांगलीच गाजली. या न्यायप्रविष्ठ प्रकरणात मुख्याधिकाऱ्यांनी काही एक मत व्यक्त करण्यास नकार दिल्याने अचानक नगराध्यक्षांचा तोल सुटला. मात्र वेळीच मध्यस्थी झाल्याने हिंसक प्रकार टळला.नगरपरिषदेमध्ये अडीच कोटी रुपयांचा साफसफाईचा कंत्राट सर्वाधिक जिव्हाळ्याचा ठरला आहे. हा कंत्राट रद्द करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. तर कंत्राट जैसे थे रहावा म्हणून दुसरा गट प्रयत्नरत आहे. त्यातच कंत्राटाचा हा वाद न्यायालयात पोहोचला आहे. नगरपरिषदेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवरील ३३ मुद्यांवर चर्चा होणार होती. त्यामध्ये दलित वस्ती विकास, हॉटमिक्सद्वारे रस्त्यांचे डांबरीकरण या सारखे विषय समाविष्ठ होते. सफाई कंत्राटाचा मुद्दा उपस्थित झाला. त्यावर प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने आपल्याला मत व्यक्त करता येणार नाही, अशी भूमिका मुख्याधिकाऱ्यांनी घेतली. त्यावर संतप्त झालेल्या नगराध्यक्षांनी ‘आपल्या स्टाईल’ने मुख्याधिकाऱ्यांचा ‘समाचार’ घेतला. यावेळी काहीसा तणाव बैठकीत निर्माण झाला होता. मात्र वेळीच हस्तक्षेप झाल्याने संभाव्य हिंसक वळण टळले. आता सफाई कंत्राटावर निर्णय घेण्यासाठी ४ डिसेंबर गुरुवारला विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली आहे. याच बैठकीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कंत्राटीपद्धतीने सेवेत सामावून घेण्याचा मुद्दा चर्चेला आला. त्यावर काही नगरसेवकांनी आक्षेप घेत जुन्या ऐवजी तरुण सुशिक्षित बेरोजगारांना संधी देण्याचा युक्तीवाद केला. त्यासाठी १९९५ च्या शासन निर्णयाचा हवाला दिला गेला. आता या प्रकरणात सर्व पक्षाच्या सदस्यांचा समावेश असलेली समिती गठित केली जाणार असून तीच निर्णय घेणार आहे. भोसा रोडवरील विद्युत डीपी हटविण्याच्या मुद्यावरही चर्चा झाली. त्यावरही सभागृहात पदाधिकारी व नगरसेवकात खडाजंगी झाली. या बैठकीत अन्य विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. एकूणच सफाई कंत्राटाभोवती नगरपरिषदेचे ‘अर्थ’कारण फिरत असल्याचे दिसून आले. (कार्यालय प्रतिनिधी)