शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्याचा शोध

By admin | Updated: January 17, 2015 00:14 IST

दुष्काळाची मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करा, असे आदेश धडकले. यासाठी २६ जानेवारी ही अखेरची तारीख देण्यात आली.

यवतमाळ : दुष्काळाची मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करा, असे आदेश धडकले. यासाठी २६ जानेवारी ही अखेरची तारीख देण्यात आली. मात्र मदतीस पात्र जिल्ह्यातील सुमारे एक लाख २५ हजार शेतकऱ्यांचे बँक खातेच नसल्याची बाब पुढे आली आहे. बारा दिवसात एवढे शेतकरी शोधण्याचे दिव्य प्रशासनाला पार पाडावे लागणार आहे. आठ लाख २५ हजार हेक्टरातील पीक भुईसपाट झाले. चार लाख ५० हजार शेतकरी मदतीस पात्र ठरले. अशा शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी एकूण २९५ कोटी २९ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. पैकी १२२ कोटी ८० लाख रुपयांचा निधी जिल्ह्याला वळता करण्यात आला. प्राप्त झालेल्या निधीतून मदत २६ जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश आहे. प्रत्यक्षात चार लाख ५० हजार शेतकऱ्यांपैकी तीन लाख २१ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्याची यादी जिल्हा प्रशासनाकडे आहे. एक लाख २९ हजार शेतकऱ्यांचे बँक खाते अजूनही गवसले नाही. असे असले तरी काही अनुभवी तहसीलदारांनी शेतकऱ्यांना मदत मिळणार असल्याचे हेरले होते. त्यावरून त्यांनी तलाठ्यांना ऐनवेळी गोंधळ नको म्हणून मदत जाहीर होण्यापूर्वीच शेतकऱ्यांचे बँक खाते, आधार कार्ड आणि छायाचित्र असलेले ओळखपत्र अशी माहिती गोळा करण्यास सांगितले होते. त्यावरून तलाठ्यांनी सुमारे महिनाभरापूर्वीच ही माहिती गोळा केली आहे. त्यामुळे काही ठिकाणी निम्म्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यांची व क्रमांकाची माहिती गोळा झाली आहे. त्या तहसीलदारांच्या आणि तलाठ्यांच्या सतर्कतेने शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत मिळण्यास उपयोग होणार आहे. (शहर वार्ताहर)पैसे मागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर चापमदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे. यासाठी तलाठ्यांनी याद्या तयार केल्या. यात गैरप्रकाराला वाव नसला तरी काही कर्मचाऱ्यांकडून तसा धाक दाखविला जाऊन पैशाची मागणी केली जात आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्याशी संपर्क केला असता, असा कुठलाही प्रकार होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. तक्रारी आल्यास कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.