शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

बारावीचे ऑफलाईन युद्ध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2022 05:00 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने शुक्रवारपासून बारावीच्या परीक्षेला ऑफलाईन पद्धतीने प्रारंभ झाला. जिल्ह्यातील साडेतीनशे परीक्षा केंद्रांवर सकाळी १०.३० वाजतापासून इंग्रजीच्या पेपरला सुरुवात झाली. ग्रामीण भागातील तुरळक घटनांचा अपवाद वगळता पहिला पेपर शांततेत, शिस्तीत आणि लाखखिंडचा अपवाद वगळता काॅपीमुक्त वातावरणात पार पडला.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तब्बल दोन वर्षांपासून कोरोनामुळे अभ्यासाचे वांदे झालेले असताना बारावीच्या विद्यार्थ्यांपुढे उभी ठाकलेली वार्षिक परीक्षा शुक्रवारपासून सुरू झाली. शाळा बंद असणे, ऑनलाईन अभ्यासात नेटवर्क नसणे, शिक्षकांशी अनेक दिवस भेट न होणे, हवे ते पुस्तक वेळेत न मिळणे, परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी बस नसणे अशा अनेक अडचणी असतानाही विद्यार्थी लढवैय्या सैनिकांप्रमाणे इंग्रजीच्या पहिल्या पेपरसाठी परीक्षेच्या मैदानात उतरले होते. तब्बल ९९ टक्के विद्यार्थ्यांची हजेरी नोंदविल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने शुक्रवारपासून बारावीच्या परीक्षेला ऑफलाईन पद्धतीने प्रारंभ झाला. जिल्ह्यातील साडेतीनशे परीक्षा केंद्रांवर सकाळी १०.३० वाजतापासून इंग्रजीच्या पेपरला सुरुवात झाली. ग्रामीण भागातील तुरळक घटनांचा अपवाद वगळता पहिला पेपर शांततेत, शिस्तीत आणि लाखखिंडचा अपवाद वगळता काॅपीमुक्त वातावरणात पार पडला.  गावातच परीक्षा असल्याने केंद्राबाहेर पालकांची गर्दी दिसली.

विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीने उघडले प्रश्नसंच - बारावी परीक्षेच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच परीक्षेचा प्रश्नसंच विद्यार्थ्याच्या स्वाक्षरीने उघडण्यात आला. बोर्डातर्फे प्रत्येक परीक्षा केंद्रावर पूर्वनियोजनानुसार पेपरचे गठ्ठे पोहोचविण्यात आले होते. पूर्वी हे गठ्ठे शिक्षक उघडून विद्यार्थ्यांना पेपर वाटत होते. मात्र यंदा पेपरचा गठ्ठा परीक्षा वर्गात आणून विद्यार्थ्यांच्या समक्ष, त्यांच्या स्वाक्षरीनिशी उघडले. 

आधी परीक्षा तब्येतीची  - कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ऑफलाईन परीक्षा होत असल्याने परीक्षा केंद्रावर विशेष काळजी घेण्यात आली. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अर्धातास आधी बोलावून सुरुवातीला थर्मल गणद्वारे त्यांच्या शरीराचे तापमान मोजण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हातावर सॅनिटायझर फवारण्यात आले. बैठक व्यवस्थाही झिकझॅक पद्धतीने करण्यात आली. वर्गांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. 

प्रत्येक केंद्रावर थेट बोर्डाचा ऑनलाईन वाॅच- शिक्षण विभागाने नेमलेल्या भरारी पथकांनी तसेच बैठ्या पथकांनी परीक्षेवर चोख नजर ठेवली. प्रत्येक केंद्रात दोन पोलीसही तैनात करण्यात आले. मात्र त्यापेक्षाही कठोर नजर बोर्डाने ऑनलाईन पद्धतीने ठेवली. पेपर संपल्याबरोबर प्रत्येक केंद्र संचालकांकडून बोर्डाने संपूर्ण विद्यार्थ्यांच्या यादीसह पेपर दरम्यानची माहिती मागविली. 

 

टॅग्स :HSC / 12th Exam12वी परीक्षाcollegeमहाविद्यालय