शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक शोषण व्यवस्था उलथवून टाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 22:30 IST

समकाळात निर्माण होणारी आव्हाने व या देशातील शोषक वर्गाने निर्माण केलेली आधुनिक शोषण व्यवस्था, इथला आंबेडकरी माणूसच उद्ध्वस्त करु शकतो. ही व्यवस्था उलथवून टाका, असे प्रतिपादन प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत, ज्येष्ठ लेखक प्रा.डॉ.अशोक पळवेकर यांनी केले.

ठळक मुद्देअशोक पळवेकर : पुसद येथे तिसऱ्या आंबेडकरी विचारवेध संमेलनाचे थाटात उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : समकाळात निर्माण होणारी आव्हाने व या देशातील शोषक वर्गाने निर्माण केलेली आधुनिक शोषण व्यवस्था, इथला आंबेडकरी माणूसच उद्ध्वस्त करु शकतो. ही व्यवस्था उलथवून टाका, असे प्रतिपादन प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत, ज्येष्ठ लेखक प्रा.डॉ.अशोक पळवेकर यांनी केले. ते येथील पंचायत समितीच्या शिवाजी सभागृहात तिसऱ्या आंबेडकरी विचारवेध संमेलनाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.विचारमंचावर उद्घाटक आंबेडकरवादी विचारसरणीचे नेते रणधीर खोब्रागडे, धम्म चळवळीतील कार्यकर्ते अरुणदादा अळणे, अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संसदेचे अध्यक्ष प्रशांत वंजारे, स्वागताध्यक्ष प्रा.सुधीर गोटे विराजमान होते. ‘एकच साहेब-बाबासाहेब’ मंडळातर्फे आयोजित अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संसदेच्या तिसऱ्या आंबेडकरी विचारवेध संमेलनाचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी तथागत गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पमाल्यार्पण करुन आणि निळी फीत कापून झाले.संमेलनाध्यक्ष डॉ.अशोक पळवेकर पुढे म्हणाले, या देशात दोन तत्वज्ञान व दोन संस्कृतीतील संघर्ष सतत चालत आलेला आहे. देशातल्या आजच्या राजकारणाने शिक्षण व्यवस्थेसह धर्मकारण, समाजकारणाला आपल्या व्यवस्थेचे बटीक बनवलेले आहे. शोषणाची ही विषमतावादी व्यवस्था मुळासकट उद्ध्वस्त करायची असेल, तर आंबेडकरी माणसाला एक सशक्त अशी राजकीय भूमिका घेणे आवश्यक आहे. आपण राजकीय भूमिका घेतलीच नाही, तर सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रातील भूमिकाही मृतप्राय ठरतात. यासाठी डॉ.आंबेडकर यांच्या वैश्विक तत्वज्ञानाशी कायम प्रामाणिक राहणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. नांदेड येथील पहिल्या आंबेडकरी विचारवेध संमेलनाच्या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. रात्री प्रवीण राजहंस आणि संचाचा आंबेडकरी जलसा कार्यक्रम झाला. प्रास्ताविक मुख्य संयोजक गणेश कांबळे यांनी केले. उद्घाटकीय सत्राचे संचालन शीतल वानखेडे, तर आभार निमंत्रक हेमंत इंगोले यांनी मानले.संमेलनाच्या यशस्वीतेसाठी साहित्य संसदेचे सचिव गंगाधर ढवळे, सहसंयोजक विशाल डाके, प्रशांत धुळे, किशोर भवरे, दिनेश चोपडे, सागर डाके, सोनू वरठी, अंकुश अघम, विक्रांत डाके, शेख महबूब, जाँबाज इराणी, आशिष अघम, अतुल हजारे, अमोल डाके, शेख दिलावर, विपुल भवरे, गाडगे आदी परिश्रम घेत आहे.बाबासाहेबांच्या विचारांची अपरिहार्यतासाहित्य संसदेचे अध्यक्ष प्रशांत वंजारे यांनी ‘समकाळात बाबासाहेबांच्या विचारांची अपरिहार्यता आणि संमेलनाची आवश्यकता’ याबाबत साहित्य संसदेची भूमिका विषद केली. इतर पाहुण्यांनीही डॉ.बाबासाहेब आंबेडकर, त्यांची साहित्य संपदा, त्यांचे विचार आदींवर प्रकाश टाकला.