शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ-चंद्रपूर सीमावर्ती भागातील अवैध धंदे बंद करा

By admin | Updated: July 18, 2016 00:55 IST

यवतमाळ व चंद्रपूर जिल्हा सीमेलगतच्या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे तथा वाहतूक फोफावली आहे.

हंसराज अहीर : वेकोलि, पोलीस, परिवहन, उत्पादन शुल्क विभागाला निर्देश यवतमाळ : यवतमाळ व चंद्रपूर जिल्हा सीमेलगतच्या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे तथा वाहतूक फोफावली आहे. यामुळे अनेक अनुचित प्रकार वारंवार घडतात. या सर्व अवैध धंद्यांवर तातडीने निर्बंध घालण्याचे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. यासाठी वेकोलि, पोलीस, परिवहन व उत्पादन शुल्क विभागास ठराविक काळाचा अल्टिमेटमही त्यांनी दिला. दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेलगत भागामध्ये फोफावलेल्या अवैध धंद्यांना आवर घालण्यासाठी कायदा व सुवस्थेबाबतची संयुक्त बैठक घुग्गुस येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी सदर निर्देश दिले. बैठकीला चंद्रपूरचे आमदार नाना शामकुळे, राजूरचे आमदार संजय धोटे, वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आर्णीचे आमदार राजू तोडसाम, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सभापती देवराव भोंगळे, यवतमाळचे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आशुतोष सलील, पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, वेकोलिचे मुख्य महाप्रबंधक राजीवरंजन मिश्र यांच्यासह दोन्ही जिल्ह्यांचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, उत्पादन शुल्कचे अधीक्षक, संबंधित भागाचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदी उपस्थित होते. वेकोलिच्या कोळसा वाहतुकीमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहे. सदर कोळसा सरसकट अवैधपणे वाहतूक केला जातो. अनेक ठिकाणी अवैधपणे कोलडेपो चालविले जातात. यावर नियंत्रण नाही, याबाबत गृहराज्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत या सर्व बाबींवर महिनाभरात प्रतिबंध घालण्याचे निर्देश दिले. कोळशाची अवैध वाहतूक किंवा साठा आढळून आल्यास तत्काळ कार्यवाही केली जावी. वकोलि परिसरातील अवैध वाहतूक व धंद्यांवर आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही बसविण्यासोबतच परिसरात फिरणाऱ्या सर्व वाहनांचे जीपीएस, जीपीआरएसद्वारे नियंत्रण करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य महाप्रबंधकांना दिले. दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेलगत मोठ्या प्रमाणावर राज्याबाहेरील वाहनांची वर्दळ आहे. या वाहनांचे परवाने आहेत का? वाहनांवर काम करणाऱ्या मजुरांची वर्तवणूक कशी आहे, या बाबींवर बारकाईने लक्ष केंद्रित केले जावे. सातत्याने नियमांचा भंग करून वाहतूक केली जात असल्यास वाहनांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या सर्व बाबींच्या सुधारणेसाठी ठरावीक काळाचा अल्टिमेटमही अहीर यांनी सर्व संबंधित विभागांना बैठकीत दिला. (स्थानिक प्रतिनिधी) दारूच्या बाटल्यांवर बारकोड करा दोन जिल्ह्यांच्या सीमेलगत अवैध मद्यविक्री केली जात आहे. तसेच जनावरांची अवैध वाहतूक व तस्करीही मोठ्या प्रमाणावर होत आहे. ही वाहतूक थांबविण्यासाठी पोलीस व परिवहन विभागाने संयुक्त कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. वणी येथील मद्य बंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याला पुरविले जाते. हा पुरवठा होऊ नये म्हणून मद्यांच्या बाटल्यांवर बारकोड करण्यात यावे. यामुळे कोणत्या दुकानातील माल चंद्रपूरला पुरविण्यात आला, याचा शोध घेणे शक्य होणार आहे. अवैध वाहतुकीवर पायबंद घालण्यासाठी ठिकठिकाणी तपासणी नाके निर्माण करण्यासोबतच सतत धाडसत्र सुरू ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले.