शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

यवतमाळात भरपूर टॅलेंट... प्रयत्न करा, जगापुढे आणा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 21:05 IST

कोणत्याही शहराची ओळख तेथील कलावंतांमुळे जगापर्यंत पोहोचते. यवतमाळात टॅलेंटची कमतरता नाही. फक्त ते टॅलेंट जगापर्यंत पाहिजे त्या प्रमाणात पोहोचत नाही.

ठळक मुद्देअनिता दाते-केळकर : ‘माझ्या नवऱ्याची बायको’फेम अभिनेत्रीची ‘लोकमत’शी विविध विषयांवर दिलखुलास चर्चा

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोणत्याही शहराची ओळख तेथील कलावंतांमुळे जगापर्यंत पोहोचते. यवतमाळात टॅलेंटची कमतरता नाही. फक्त ते टॅलेंट जगापर्यंत पाहिजे त्या प्रमाणात पोहोचत नाही. टॅलेंट जगापुढे आणण्यास तरुण, तरुणींनी प्रयत्न वाढविले पाहिजे, असे आपुलकीचे आवाहन प्रसिद्ध अभिनेत्री अनिता दाते-केळकर यांनी केले.‘माझ्या नवऱ्याची बायको’ या टीव्ही मालिकेतून लोकप्रिय झालेल्या अनिता केळकर तसेच सिनेअभिनेत्री श्रृती मराठे, प्राजक्ता माळी, अभिनेता अभिजित खांडकेकर शनिवारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने यवतमाळात आले होते. यावेळी अनिता दाते यांनी ‘लोकमत’शी दिलखुलास गप्पा केल्या. मालिकेतील राधिका सुभेदार हे त्यांचे पात्र वैदर्भी भाषेतच बोलते. याबाबत विचारले असता अनिता म्हणाल्या, या मालिकेवर सुुरवातीला नागपुरातूनच टीका झाली होती. विदर्भाची अशी भाषा नाहीच, असा दावा करण्यात आला होता. मात्र आता विदर्भातील प्रेक्षकांच्या सपोर्टमुळेच मालिकेतील भाषा लोकप्रिय होत आहे. तशी ती पूर्ण वैदर्भी भाषा नाही, तिला केवळ वैदर्भी ‘फ्लेवर’ देण्याचा आम्ही प्रयत्न केला. विदर्भाशी माझा खूप आधीपासून संबंध आहे. झाडीपट्टी नाटकांची येथे समृद्ध परंपरा आहे. नाट्यप्रयोगाच्या निमित्ताने बरेचदा विदर्भात आले. ‘ए भाऊ डोकं नको खाऊ’ हे व्यावसायिक नाटक आम्ही चंद्रपूर, ब्रह्मपुरी, यवतमाळातही केले. फक्त मालिकेमुळे गेल्या अडीच वर्षांपासून जरा नाटकांपासून दूर आहे. पण यवतमाळात, पुसदमध्ये माझे काही कलावंत मित्र आहेत. त्यांच्यामुळे यवतमाळविषयी मला फार आपलेपणा वाटतो.प्रत्येक शहरात नाट्यगृह हवेचव्यावसायिक नाटकांचा विषय निघालेला असतानाच यवतमाळातील अर्धवट नाट्यगृहाबाबत अनिता केळकर म्हणाल्या, यवतमाळच नव्हेतर प्रत्येक शहरात नाट्यगृह आवश्यकच आहे. जसे आपण शहराच्या आरोग्याची, शिक्षणाची काळजी घेतो, तशीच शहराची संस्कृती घडविण्यासाठी नाट्यगृह गरजेचे आहे. नाट्यगृह पूर्ण करणे ही इथल्या सत्ताधाऱ्यांची आणि नागरिकांचीही जबाबदारी आहे. नाट्यगृहावरच या शहराचा विकास अवलंबून आहे. नाट्यगृह झाल्यास वेगवेगळ्या कलावंतांना बघण्याची संधी तर मिळेलच, शिवाय स्थानिक लोकांच्या कलेलाही भरपूर वाव मिळेल. पण नाट्यगृह म्हणजे केवळ इमारत बांधू नये, ते ‘टेक्निकलीही’ परिपूर्ण असावे. यवतमाळात होऊ घातलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला येण्याची खूप इच्छा आहे. मात्र वेळेवर कसे नियोजन होते, ते बघावे लागेल.‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील राधिका सुभेदार यवतमाळच्या ग्रामीण महिलांना काय संदेश देऊ इच्छिते या प्रश्नावर अनिता केळकर म्हणाल्या, कोणतीही स्त्री कमी नसते. स्त्रीने बाहेरचे जगही अनुभवले पाहिजे. पण ग्रामीण महिलांना घराबाहेर पडण्यास वाव नसेल, तर त्यांनी आपल्या घरातील, संसारातील आवडीचे काम करावे. कुटुंब सांभाळणे हे कामही सोपे नाही. महिलांनी पहिल्यांदा आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. काम कोणतेही करा, पण ते आनंदी राहण्यासाठी करा. पुरुषांनीही महिलांना कमी लेखू नये. विरोध न करणे हीसुद्धा एकप्रकारची मदतच.लोकमत सखी मंचचा कलावंतांना ‘सपोर्ट’अवघ्या मराठी वाचकांमध्ये ‘लोकमत’ची वेगळी ओळख आहे. ‘लोकमत सखी मंच’ने तर महिलांना खूप वाव मिळवून दिला आहे. मी मूळची नाशिकची असल्याने मला ठाऊक आहे, सांस्कृतिक कार्यक्रमांना, चळवळींना लोकमत नेहमी सपोर्ट करते. लोकमतच्या माध्यमातून नेहमी विविध स्पर्धा होत असतात. त्यामाध्यमातून सांस्कृतिक क्षेत्राला नवी दिशा मिळत असते, असे गौरवोद्गार अनिता केळकर यांनी काढले.

टॅग्स :Anita Dateअनिता दाते