शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

बोगस आदेश तयार करून वृक्षतोडीचा प्रयत्न

By admin | Updated: July 16, 2015 02:38 IST

उपविभागीय अधिकाऱ्यांचा बनावट आदेश तयार करून सागवान तोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जनुना येथील शेतकरी गणपत यमनाराव मस्के याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिशाभूल : जनुनाच्या शेतकऱ्यावर गुन्हा पुसद : उपविभागीय अधिकाऱ्यांचा बनावट आदेश तयार करून सागवान तोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जनुना येथील शेतकरी गणपत यमनाराव मस्के याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकरी गणपत मस्के यांनी वर्ग २ च्या जमिनीवरील सागवान तोडण्यासाठी पुसद उपवनसंरक्षकांकडे अर्ज दाखल केला. मात्र ही जमीन वर्ग २ ची असल्याने त्यावरील सागवानाच्या मालकी हक्कासाठी सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असते. यासाठी मस्के यांनी नायब तहसीलदार यांचे बनावट नाहरकत प्रमाणपत्र २५ फेब्रुवारी २०१५ रोजी आणि उपविभागीय अधिकारी यांचा २ फेब्रुवारी २०१५ रोजींचा आदेश तयार केला. या विषयी पुसद वनसंरक्षकांना शंका आली. यावरून उपवनसंरक्षक कार्यालयाने नायब तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांकडून खात्री केली असता एनओसी आणि आदेश बनावट असल्याचे स्पष्ट झाले. मस्के यांनी शेत सर्वेनंबर १९९, क्षेत्रफळ ४ हेक्टर ४५ आर या जमिनीवरील सागवान तोडण्यासाठी ही सर्व उठाठेव केली. या प्रकरणी उपविभागीय अधिकारी चंद्रकांत जाजू आणि नायब तहसीलदार देवानंद धबाले यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. या वरून सदर शेतकऱ्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर शेतकऱ्याने स्टॅम्प कोठून तयार केला, स्वाक्षरी स्वत: केली की इतरांकडून करवून घेतली, याचाही शोध घेतला जात आहे. शासनाची दिशाभूल करणाऱ्या या प्रकारामुळे तालुक्यात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. अशी आणखी काही प्रकरणे घडली असावी काय, या दृष्टीनेही तपासकार्य सुरू केले आहे. (प्रतिनिधी)