शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

आंध्रप्रदेशातून मॅग्नीजसाठी आलेले ट्रक अखेर परतले

By admin | Updated: July 9, 2014 23:53 IST

येथून २५ किलोमीटर अंतरावरील आंध्रप्रदेश सीमेवरील हिवरी येथील मॅग्नीज उत्खननाचे प्रकरण सात दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते़ ‘लोकमत’चा दणका बसताच झोपलेले तहसील प्रशासन खडबडून

नीलेश यमसनवार - पाटणबोरीयेथून २५ किलोमीटर अंतरावरील आंध्रप्रदेश सीमेवरील हिवरी येथील मॅग्नीज उत्खननाचे प्रकरण सात दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते़ ‘लोकमत’चा दणका बसताच झोपलेले तहसील प्रशासन खडबडून जागे झाले अन् संबंधित शेतकऱ्याच्या विरोधामुळे मॅग्नीज नेण्यासाठी आलेले चार ट्रक, एक जेसीबी मशीन अखेर परत गेली. गेल्या सात दिवसांपूर्वी ‘लोकमत’मध्ये मॅग्नीजच्या अवैध उत्खननाचे वृत्त प्रकाशित होताच पांढरकवडा तहसीलमधील नायब तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला होता. त्यांनी उत्खनन करण्यात आलेल्या मॅग्नीज दगडांच्या ढिगाचा पंचनामा करून सदर शेतकऱ्याच्या सुपूर्दनाम्यावर मॅग्नीज दडक जागीच ठेवून ते खाली हाताने परतले होते. या मॅग्नीज उत्खनन प्रकरणात कोणतीही मोठी कारवाई न करता केवळ कागदोपत्रीच कारवाईचा फास आवळण्यात आला होता. त्यानंतर अहवाल पाठविण्यापलीकडे महसूल विभागाने कोणतीही कारवाई केली नाही़ दरम्यान पंचनामा करण्यात आलेले मॅग्नज दगड भरण्याकरिता मंगळवारी ८ जुलैला मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास हैद्राबादजवळील एका कंपनीचे चार ट्रक आणि जेसीबी मशीन आली होती, असे वृत्त आहे. मात्र शेतकऱ्याच्या विरोधानंतर ते चार ट्रक रिकामे परत गेले़ ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यापासून उत्खनन संपूर्णपणे बंद झाले होते़ मात्र आठ-दहा दिवसांच्या कालावधीनंतर मॅग्नीज माफिया पुन्हा सक्रिय झाले व त्यांनी मंगळवारी चार ट्रक लावून उत्खनन करण्यात आलेला मॅग्नीज दगड भरण्याचा प्रयत्न केला. मात्र तो विफल झाला़ सदर दगडाचे उत्खनन गेल्या दीड वर्षांपासून सुरू असहे. परिसरातील मॅग्नीज, लाईमस्टोन, सिलीकॉनचा अमूल्य साठा आता आंध्रातील माफियांच्या निशाण्यावर असल्याचे त्यातून स्पष्ट होत आहे़ तहसीलचे काही कर्मचारी व वन कर्मचारी यांना विश्वासात घेऊनच हे उत्खनन सुरू असल्याची चर्चा आहे. सुमारे एक वर्षापूर्वी ज्या शेतकऱ्याने मॅग्नीज दिले, ती कंपनी वेगळी व आता मॅग्नीज घेणारी कंपनी वेगळी असल्याची माहिती आहे. सदर कंपनी या भोळ्याबाभड्या, अशिक्षित, गरीब शेतकऱ्यांना केवळ ५०० रूपये ब्रास प्रमाणे मोबदला देत असल्याची माहिती आहे़