शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

किन्हाळाजवळ धावता ट्रक पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 21:42 IST

पांढरकवडा मार्गावरील किन्हाळा गावाजवळ धावता ट्रक पेटल्याची घटना बुधवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत ट्रकचा पूर्णत: कोळसा झाला. जवळपास ३ तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कमोहदा : पांढरकवडा मार्गावरील किन्हाळा गावाजवळ धावता ट्रक पेटल्याची घटना बुधवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत ट्रकचा पूर्णत: कोळसा झाला. जवळपास ३ तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.चंद्रपूरकडून यवतमाळकडे निघालेला ट्रक (एमएच २६ एच ८३४१) पंक्चर झाला. ब्रेक मारल्याने घासत गेलेल्या टायरने पेट घेताच संपूर्ण ट्रक बेचिराख झाला. या ट्रकद्वारे सिमेंटची वाहतूक केली जात होती. पांढरकवडा, यवतमाळहून आलेल्या अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणली. करंजी महामार्ग पोलीस, वडगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.घटनास्थळापासून जवळच शेतातील विहिरीवरून पाणी घेऊन ट्रक विझविण्याचा नागरिकांचा प्रयत्न होता. मात्र वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यावेळी काही लोकांनी विद्युत कंपनीशी संपर्क करून वीज सुरू करण्याची विनंती केली. मात्र कंपनीने भारनियमन सुरू असल्याचे सांगत वीज पुरवठा सुरळीत करण्यास स्पष्ट नकार दिला. विहिरीचे पाणी मिळाले असते तर ट्रक बेचिराख होण्यापासून वाचला असता, असे मत व्यक्त होत आहे.