शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

ट्रक दरोड्यात साजीद टोळीवर संशय

By admin | Updated: May 7, 2016 02:28 IST

राष्ट्रीय महामार्गावरील करंजी पुलानजीक ट्रकवर दरोडा घालून दीड लाख रुपये लुटल्याप्रकरणी पोलिसांना पांढरकवड्यातील कुख्यात लुटारू साजीद टोळीवर संशय आहे.

पांढरकवडा एसडीपीओ : तीन पथके रवाना, नागपुरात आश्रयाला असण्याचीही शक्यतापांढरकवडा : राष्ट्रीय महामार्गावरील करंजी पुलानजीक ट्रकवर दरोडा घालून दीड लाख रुपये लुटल्याप्रकरणी पोलिसांना पांढरकवड्यातील कुख्यात लुटारू साजीद टोळीवर संशय आहे. पोलिसांनी या टोळीचे लोकेशन शोधण्यासाठी मोेर्चेबांधणी चालविली आहे. उत्तरप्रदेशातून चेन्नईकडे जाणाऱ्या ट्रकवर गुरुवारी पहाटे करंजी उड्डाण पुलानजीक दरोडा घातला. चालकाला मारहाण करून ट्रकच्या कॅबिनमधील एक लाख ४० हजार रुपये लुटून नेण्यात आले. दोन महिन्यात लागोपाठ घडलेल्या दरोड्याच्या या घटनेने वडकी, पांढरकवडा आणि महामार्ग पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे. दरोड्याच्या या घटनेत बोलेरो गाडीचा वापर झाल्याने पोलिसांना येथील गुंड शेख साजीद अब्दूल गफ्फार याच्या टोळीवर संशय बळावला आहे. कारण दोन महिन्यांपूर्वी साजीद टोळीने वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रुईगठाणींचा ट्रक लुटण्यासाठी त्याच्या चालकाचा निर्घृण खून केला होता. मात्र वेळीच पोलीस पोहोचल्याने ट्रक लुटण्याचा प्रयत्न फसला. या घटनेत वापरलेल्या बोलेरो गाडीसह साजीद अद्याप फरार आहे. गुरुवारी पहाटे घडलेल्या ट्रकवरील दीड लाखांच्या दरोड्यातही साजीद टोळीचाच हात असावा, अशी दाट शक्यता पांढरकवडा येथील प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी माधव गिरी (वणी) यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. गिरी म्हणाले, साजीदवर दरोडा, वाटमारी सारखे गुन्हे दाखल आहेत. तो नागपुरातील अशा स्वरूपाच्या गुन्हेगारांकडे आश्रयाला आहे. त्यांच्याच मदतीने साजीदने ट्रक लुटीचा गुन्हा केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी साजीदवर तपास केंद्रीत केला आहे. आपण केव्हा ना केव्हा पोलिसांच्या हाती लागणारच त्यामुळे बाहेर आहे, तोपर्यंत गुन्हे करण्याची त्याची मानसिकता असू शकते. पोलिसांनी साजीद सोबतच रेकॉर्डवरील अन्य गुन्हेगारांवर तसेच नवख्या गुन्हेगारांचा यात सहभाग आहे काय या दृष्टीने लक्ष केंद्रीत केले असल्याचे गिरी यांनी स्पष्ट केले. ट्रक लुटीच्या या गुन्हाचा तपास ठाणेदार गुलाबराव वाघ यांच्याकडे आहे. लुटारू नेमके चार होते की अधिक याबाबत फिर्यादीच संभ्रमात असल्याची माहिती माधव गिरी यांनी दिली. कारण फिर्यादीच्या भाषेची अडचण निर्माण झाली आहे. त्यांची भाषा समजणे कठीण आहे. शिवाय घटनेच्यावेळी पाऊस सुरू असल्याने आणि ते घाबरल्याने लुटारूंची नेमकी संख्या किंवा तोंड ओळख सांगणे त्यांना कठीण गेल्याचे गिरी यांनी सांगितले. दरम्यान ट्रक लुटीतील आरोपींच्या शोधार्थ पांढरकवडा पोलिसांनी आपली तीन पथके आदिलाबाद, नागपूर आणि वणीकडे रवाना केली आहे. (शहर प्रतिनिधी)साजीदच्या घरांची झडतीपांढरकवड्यातील अट्टल गुन्हेगार साजीद याच्या पांढरकवडा व यवतमाळातील घराची वडकीचे ठाणेदार अमोल माळवे यांच्या पथकाने यापूर्वीच झडती घेतली आहे. ट्रक चालकाच्या खून प्रकरणात साजीदचे दोन साथीदार पोलिसांच्या हाती लागले. मात्र साजीदसह अन्य तिघे फरार आहे. वडकी पोलीस त्यांचा शोध घेत आहे.अपर पोलीस अधीक्षक पांढरकवड्यात दाखलजिल्ह्याचे प्रभारी एसपी तथा अपर पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे यांनी शुक्रवारी पांढरकवडा येथे भेट दिली. त्यांनी घटनास्थळाची पाहणीही केली. शिवाय तपासाबाबत पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.