घाटंजी : दुचाकीला धडक देऊन ट्रक नदीत कोसळल्याने झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले. हा अपघात शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास लगतच्या खापरी गावाजवळ वाघाडी नदीच्या पुलावर घडला. अपघातात ट्रकचा चुराडा झाला. भगवान गणपत पाटील (५३), रमेश महादेव आत्राम (४२) रा.किनवट आणि शुभम अशोक देठे (२४) रा. खापरी अशी जखमींची नावे आहेत. एम.एच.२६/एच-७६१६ हा ट्रक नागपूरहून वीज तारा घेऊन घाटंजी मार्गे किनवटकडे निघाला होता. खापरी येथील पुलावर या ट्रकची एम.एच.२९/ई-४४४८ या दुचाकीला धडक बसली. नियंत्रण सुटल्याने ट्रक नदीत कोसळला. यात दोघे जण जखमी झाले. त्यांना यवतमाळ येथे, तर दुचाकीस्वारास नागपूर येथे हलविण्यात आले. अपघातस्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. (तालुका प्रतिनिधी)
दुचाकीला धडक देऊन ट्रक नदीत कोसळला
By admin | Updated: September 7, 2015 02:20 IST