शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

अडचणीत आलेल्या तोरना, मरनाले दिल्लीची नाही, गल्लीतलीच बाई कामी येते - वैशाली येडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 9:41 PM

अडचणीत आलेल्या तोरना, मरनाले दिल्लीची नाही, गल्लीतलीच बाई कामी येते, हे पुन्हा सिद्ध झालं, अशा शब्दात आपले मनोगत ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटक आत्महत्याग्रस्त शेतकरी सुधाकर येडे यांच्या पत्नी वैशाली येडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे पुनर्जन्म मानत नाही, तसे असते तर मीही आत्महत्या केली असती.

स्नेहा मोरेलोकमत न्यूज नेटवर्कराष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरीयवतमाळ : अडचणीत आलेल्या तोरना, मरनाले दिल्लीची नाही, गल्लीतलीच बाई कामी येते, हे पुन्हा सिद्ध झालं, अशा शब्दात आपले मनोगत ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटक आत्महत्याग्रस्त शेतकरी सुधाकर येडे यांच्या पत्नी वैशाली येडे यांनी व्यक्त केले.मराठीच्या एवढ्या मोठ्या मंगल सोहळ्यात कुंकुवाचा टिळा लावण्यासाठी माज्यासारखी विधवा कामी आली हे माझं भाग्य समजते असे म्हणत येडे यांनी आवर्जून नमूद केले. ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांचे उदघाटक म्हणून आमंत्रण रद्द केल्यानंतर संमेलनाच्या उद्घाटकाचा मान कोणाकडे जाणार याबाबत सर्व स्तरांवर चर्चा रंगत होती. काही मान्यवर साहित्यिकांनी पुन्हा सहगल यांना सन्मानाने आमंत्रित करण्याची मागणी केली होती. अखेर संयोजकांनी गुरुवारी दुपारी या वादावर पडदा टाकत वैशाली येडे यांचे नाव उद्घाटक म्हणून घोषित केले. त्यांनतर येडे यांच्या मनोगताविषयी साहित्य वतुर्ळात उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र याला पूर्णविराम देत येडे यांनी अत्यंत परखड आणि बेधडकपणे आपले मनोगत व्यक्त करीत उपस्थितांची दाद मिळवली.याप्रसंगी येडे यांनी म्हटले की , पुनर्जन्म मानत नाही, तसे असते तर मीही आत्महत्या केली असती. शेतकरी मरणानंतर अंबानी, अदानी होत नाही हे माज्या नवऱ्याला समजले नाही याची खंत आहे. माझा मात्र या जन्मावर विश्वास आहे म्हणून याच जन्मात ही वायद्याची शेती फायद्यात करण्यासाठी लढत आहे. मी बहिणाबाईंची लेक आहे, म्हणून कोणी अंगावर हात टाकला तर त्याला हात दाखविण्याची ताकद आहे, असे सांगत मी विधवा नाही, एकल महिला आहे असे येडे यांनी अधोरेखित केले. लेखन, साहित्याचा बाजार वाचत नाही , मी माणसांमध्ये राहून माणस वाचली, पण साहित्यातून जगण्याच बळ मिळत हे खरे आहे. त्यामुळेच 'तेरव' या नाट्यकृतीचा जन्म झाला. यातून एकल महिलांच्या जगण्याचा मदार्नी संघर्ष दाखविला आहे असे येडे म्हणाल्याजग रहाटीनं लादलेल विधवापणबाई नवऱ्याच्या घरी जाताना कुळ, दैवत, माय-बाप नवअडचणीत आलेल्या तोरना, मरनाले दिल्लीची नाही, गल्लीतलीच बाई कामी येते, हे पुन्हा सिद्ध झालं, अशा शब्दात आपले मनोगत ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटक आत्महत्याग्रस्त शेतकरी सुधाकर येडे यांच्या पत्नी वैशाली येडे यांनी व्यक्त केले. मात्र असेच एखाद्या पुरुषाच्या बाबतीत झाले तर त्याला जमेल का असा परखड सवाल येडे यांनी उपस्थित केला. माज्या वाट्याला आलेल पांढर कपाळ हे निर्सगाच्या नियमाने आलेल नाही तर जगरहाटीनं आले आहे असे सांगत व्यवस्थेन अडचणीत आलेल्या तोरना, मरनाले दिल्लीची नाही, गल्लीतलीच बाई कामी येते, हे पुन्हा सिद्ध झालं, अशा शब्दात आपले मनोगत ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उदघाटक आत्महत्याग्रस्त शेतकरी सुधाकर येडे यांच्या पत्नी वैशाली येडे यांनी व्यक्त केले.लेखक अन कास्तकार सारखेचतुम्ही आमच्या दु:खावर कादंबऱ्या लिहिता, कथा लिहिता..त्याला पुरस्कार मिळतात. त्यावर सिनेमेही निघतात मात्र त्याला भाव मिळत नाही असे म्हणत लेखक आणि कष्टकरी सारखेच असल्याचे येडे म्हणाल्या. मात्र आता संमेलनाच्या निमित्ताने अभावात जगणाऱ्याला भाव मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन