शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

४०० कोटींच्या तुरीवर व्यापाऱ्यांचा डोळा

By admin | Updated: May 8, 2017 00:14 IST

जिल्ह्यात सध्या तूर खरेदी सुरू आहे. मात्र टोकनवर नोंद न झालेल्या तब्बल ४०० कोटींच्या आठ लाख क्विंटलवर व्यापाऱ्यांचा डोळा आहे.

आठ लाख क्विंटल : टोकनवर नोंदणी न झाल्याने पेच, पाच वर्षात पेरा दुप्पट रूपेश उत्तरवार । लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्ह्यात सध्या तूर खरेदी सुरू आहे. मात्र टोकनवर नोंद न झालेल्या तब्बल ४०० कोटींच्या आठ लाख क्विंटलवर व्यापाऱ्यांचा डोळा आहे. ही तूर पडलेल्या दरात खरेदी करण्यासाठी त्यांनी मोर्चेबांधणी केली आहे. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत तुरीचा पेरा दुपटीने वाढला. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानामुळे ही वाढ झाली. २०११ मध्ये ९७ हजार हेक्टरवर तुरीचा पेरा होता. २०१६ मध्ये तो एक लाख ७३ हजार ५३८ हेक्टरवर पोहोचला. यामुळे यावर्षी तुरीच्या उत्पन्नातही प्रचंड वाढ झाली. जिल्हा प्रशासनाने १५ लाख क्विंटल तुरीचे उत्पन्न होण्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला होता. तो तंतोतंत खरा ठरला. मात्र शासनाने ही तूर खरेदी करण्यासाठी तरीही उपाययोजना केल्याच नाहीत. त्यामुळे अद्याप शेतकऱ्यांच्या ४०० कोटींची तूर पडून आहे. त्याची टोकनवर नोंदणीही झाली नाही. त्यामुळे शेतकरी पेचात सापडले आहे. नाफेडने एक लाख ५४ हजार ५६४ क्विंटल, तर व्हीसीएमएसने ४३ हजार ४८१ क्विंटल तूर खरेदी केली. याशिवाय व्यापाऱ्यांनी दोन लाख १९ हजार ४८० क्विंटल तुरीची खरेदी केली. एकूण चार लाख १७ हजार ५२५ क्विंटल तुरीची खरेदी आत्तापर्यंत झाली आहे. टोकनवरील एक लाख ७३ हजार क्विंटल तुरीचे मोजमाप होणार आहे. एक लाख क्विंटल तुरीचा बियाणे आणि डाळीसाठी वापर होणार आहे. यानंतरही तब्बल आठ लाख क्विंटल तूर शिल्लक राहणार आहे. सरकार व्यापाऱ्यांच्याच पाठीशी सामान्यंना माफक दरात तूरडाळ मिळावी म्हणून राज्याने विदेशातून तूरडाळ आयात केली. यानंतर तुरीचे दर गडगडले. त्यामुळे तुरीच्या दरात घसरण झाल्याने डाळ ४० रूपयांवर येणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात झाले उलटेच आत्ताही तूरडाळ ८० रूपयांवर स्थिरावली आहे. यामुळे शासनाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला गेल्याचे स्पष्ट होते. यात सर्वाधिक लाभ व्यापाऱ्यांचाच झाला. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या नव्हे, तर व्यापाऱ्यांच्याच पाठीशी असल्याचे दिसून येत आहे. तुरीचे दर घरसले आहे. मात्र बाजारात डाळीचे दर कायमच आहे. तुरीचे दर प्रती क्विंटल पाच हजार रूपये असताना डाळ ८० रूपये किलोने विकली जात होती. आता तुरीचे दर खुल्या बाजारात ३८०० रूपये असूनही तूरडाळीचे दर मात्र अद्याप कायमच आहे. त्यात किंचीतही घसरण झाली नाही.