शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

निष्क्रीय आदिवासी आमदारांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 00:05 IST

धनगरांना आदिवासी समजून आदिवासींच्या कोट्यातून सवलती देण्याचा निर्णय सरकारने घेतला. यानंतरही आदिवासी आमदार ब्र शब्दही बोलायला तयार नाही. यामुळे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने राज्यातील आदिवासी आमदारांना प्रतिकात्मक श्रद्धांजली अर्पण केली.

ठळक मुद्देनिषेध आंदोलन : धनगरांना आदिवासी सवलती देऊ नका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : धनगरांना आदिवासी समजून आदिवासींच्या कोट्यातून सवलती देण्याचा निर्णय सरकारने घेतला. यानंतरही आदिवासी आमदार ब्र शब्दही बोलायला तयार नाही. यामुळे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने राज्यातील आदिवासी आमदारांना प्रतिकात्मक श्रद्धांजली अर्पण केली. भाजपाच्या आदिवासी विरोधी धोरणाचा निषेध नोंदविला. शुक्रवारी स्थानिक तिरंगा चौकामध्ये हे अभिनव आंदोलन करण्यात आले.अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या नेतृत्वात हे आंदोलन आले. आंदोलकांनी आदिवासी आमदारांचा तीव्र निषेध नोंदविला. यावेळी जिल्हा प्रशासनामार्फत राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. धनगर जातीला आदिवासीप्रमाणे शासनाच्या सोयी सुविधा देण्यात येऊ नये. त्यासाठी आदिवासींचा निधी वापरण्यात येऊनये, आदिवासींना वनजमिनी घरे, अतिक्रमणे नियमानुकूल करून त्यांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अमलबजावणी करण्यात यावी. डीबीटी योजना बंद करून पूर्वीप्रमाणे विद्यार्थ्यांना भोजनाची व्यवस्था करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरेश गेडाम, राजू चांदेकर, आॅल इंडिया एम्पलॉईज फेडरेशनचे गुलाब कुडमेथे, अनुसूचित जाती जमाती संघटनेचा अखिल भारतीय परिसंघ शाखेचे एम. के. कोडापे, शामादादा कोलाम बिरसा ब्रिगेड संघटना शाखेचे शैलेश गाडेकर, बिरसा ब्रिगेडचे डॉ. अरविंद कुडमेथे, फासेपारधी संघटनेचे बाबाराव राठोड, आनंद देवगडे, विठोबाजी मसराम, पवन आत्राम, गणेश मेश्राम, निळकंठ तोडसाम, खुशाल गेडाम, प्रा. वसंत कनाके उपस्थित होते.

टॅग्स :StrikeसंपDhangar Reservationधनगर आरक्षण