शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींचे धरणे आंदोलन

By admin | Updated: January 15, 2015 23:00 IST

धनगर समाजाचा अनुसूचित जमातील समावेश करू नये, त्यांना अनुसूचित जमातीचे आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी येथील तहसीलसमोर बुधवारी धरणे आंदोलन झाले.

वणी : धनगर समाजाचा अनुसूचित जमातील समावेश करू नये, त्यांना अनुसूचित जमातीचे आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी येथील तहसीलसमोर बुधवारी धरणे आंदोलन झाले. धनगर समाज संघर्ष समितीतर्फे नागपूर येथे गेल्या ४ जानेवारीला आरक्षण अंमलबजावणी अधिवेशन घेण्यात आले़ त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याचा निर्णय घेऊ, असे जाहीर अभिवचन दिले होते. वास्तविक धनगर समाज हा भटक्या विमुक्त जमातीत येतो. या जमातीचे आरक्षणही त्यांना लागू आहे़ भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद १३ प्रमाणे कोणत्याही समाजाला जे मूलभूत अधिकार देण्यात आले, त्या समाजाच्या मूलभूत अधिकाराला बाधा पोहोचेल अथवा त्याची व्याख्या संकुचित होईल, असा निर्णय कोणत्याही सरकारच्या सदनाला घेता येत नाही. सरकारला घटना विरोधी कुठलीही कृती करता येत नाही़ असे असताना मुख्यमंत्र्यांची घोषणा घटनाबाह्य असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. मुख्यमंत्र्याच्या घोषणेमुळे आदिवासी समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. यामुळे राज्यात वाद विवाद निर्माण होऊन अस्थिरता येऊ शकते़ मुख्यमंत्र्यानी केलेल्या घोषणेची आदिवासी बांधवांनी निंदा केली. त्यासाठी आदिवासी आरक्षण बचाव समितीने येथील तहसीलसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. या धरणे आंदोलनात गीत घोष, संतोष पेंदोर, राजू गालेवार, सुभाष चांदेकर, बाबाराव मडावी, राजेंद्र सिडाम, दयाशंकर मडावी, अनिल गेडाम आदी समाज बांधवांनी सहभाग घेतला. त्यांनी अनुसूचित जमातीच्या आरक्षणात धनगर समाजाचा समावेश करू नये, आदिवासींना १३ टक्के आरक्षण लागू करावे, आदिवासींसाठी सरकारी नोकर भरतीची वयोमर्यादा ४५ वर्षांपर्यंत वाढवावी, आदी मागण्या केल्या. (कार्यालय प्रतिनिधी)