शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

क्षेत्रबंधन उठल्याने आदिवासींचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 22:35 IST

क्षेत्रबंधन कायदा रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या माध्यमातून शिवाजीराव मोघे यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेतली.

ठळक मुद्देपृथ्वीराज चव्हाण : इंदिरा गांधी आणि वसंतराव नाईकांचे प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : क्षेत्रबंधन कायदा रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या माध्यमातून शिवाजीराव मोघे यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेतली. सतत दहा वर्ष आदिवासी युवक संघाद्वारे सनदशीर मार्गाने संघर्ष केला. तब्बल ४१ वर्षानंतर वसंतराव नाईकांच्या प्रयत्नाने क्षेत्रबंध उठले आणि आदिवासींचा खरा विकास झाला, असे प्रतिपादन काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केले.आदिवासी नेते माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे लिखित ‘आदिवासींचे क्षेत्रबंधन आणि इंदिरा गांधी’ या पुस्तकाचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पुसद येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सुधाकरराव नाईक प्रेक्षागृहात आयोजित सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आमदार मनोहरराव नाईक होते. प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे उपसभापती आमदार माणिकराव ठाकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, आमदार अशोक टारफे, माजी मंत्री प्रा.वसंतराव पुरके, माजी आमदार विजय खडसे, लक्ष्मणराव तायडे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, अ‍ॅड. सचिन नाईक उपस्थित होते. उपसभापती माणिकराव ठाकरे म्हणाले, लोकशाही आबाधित ठेवण्याचे कार्य काँग्रेस पक्षाने केले. इंदिरा गांधींची कामगिरी देश कधीही विसरु शकत नाही. प्रास्ताविकात अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी इंदिरा गांधी व वसंतराव नाईक यांच्या सहकार्यातून क्षेत्रबंध कायदा हटविण्यात आला. ही माहिती तरुणांना व्हावी यासाठी पुस्तक लिहिल्याचे सांगितले. कार्यक्रमाला तातू देशमुख, जीवन पाटील, रेखाताई मोघे, पी.बी. आडे, जय नाईक, अ‍ॅड. दिलीप एडतकर, अजय पुरोहित, मारोतराव वंजारे, रामकृष्ण चौधरी, जितेंद्र मोघे, शामराव व्यवहारे उपस्थित होते. संचालन सुरेश धनवे यांनी तर आभार अजाबराव उईके यांनी मानले.