शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
4
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
5
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
6
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
7
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
8
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
9
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
10
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
11
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
12
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
13
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
14
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
15
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
16
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
17
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
18
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
19
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
20
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?

आदिवासी विभागात चालक, वाहकाकडून कार्यालयीन कामे

By admin | Updated: October 3, 2014 02:14 IST

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक अंतर्गत अनेक कार्यालयात वाहक व चालकाकडून कार्यालयीन कामे करून घेतली जात आहे.

कळंब : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक अंतर्गत अनेक कार्यालयात वाहक व चालकाकडून कार्यालयीन कामे करून घेतली जात आहे. मंडळाच्या शासकीय गाड्या मोडकळीस आल्याने चालक व वाहकांना कार्यालयीन कामात जुंपण्यात आले. परिणामी शासकीय कामांचा खोळंबा सुरु झाला आहे. कळंब येथे आदिवासी विभागाचे उपप्रादेशिक कार्यालय आहे. या कार्यालयातर्गंत कळंब, यवतमाळ, राळेगाव, बाभूळगाव, पुसद, उमरखेड, महागाव, दिग्रस, दारव्हा, नेर व आर्णी या तालुक्यांचा कारभार पाहला जातो. सुरवातीपासून या कार्यालयाला स्वत:चे चारचाकी वाहने उपलब्ध होती. या वाहनावर चालकासोबत वाहकाची नेमणूक करण्यात आली होती. या वाहनातून आश्रमशाळेमध्ये जाग्यावर धान्य व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात होता. तसेच खावटी वाटप करण्यासाठी याच वाहनातून धान्याची वाहतूक केली जात होती. स्वस्त धान्य दुकानातही माल पोहचविला जात होता. यासोबतच महामंडळामार्फत धान्य खरेदी करण्यात आल्यानंतर शेतमालाची आदिवासी विभागाच्या याच वाहनातून वाहतूक होत होती. परंतु दरम्यानच्या काळात या वाहनाचे कुठलेही मेंटनन्स न राखल्याने ही वाहने मोडकळीस आली. नवीन वाहने घेण्याचा प्रस्ताव अनेक वर्षापासून प्रलंबित होता. त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. नुकतेच महाराष्ट्रासाठी ३२ वाहनांची खरेदी करण्यात आली. परंतु जिल्ह्यात मात्र केवळ एक वाहन उपलब्ध झाले. त्यातल्या त्यात तेही वाहन अनेक तांत्रिक कारणांमुळे जागेवरच उभे आहे. पुर्वीसारखी या विभागाजवळ पर्याप्त वाहने नाही. त्यामुळे या वाहनावरील चालक व वाहकांची वीस वर्षांपेक्षा जास्त कालावधीची सेवा लक्षात घेता त्यांना कामावरून कमी न करता कार्यालयीन कामांमध्ये जुंपण्यात आले. हा प्रकार मागील चार-पाच वर्षांपासून सुरु आहे. आजच्या स्थितीत कळंब कार्यालयामध्ये वाहक व चालकांनाही कार्यालयीन कामात जुंपण्यात आले आहे. त्यांना कार्यालयीन कामाचा कुठलाही अनुभव नसल्यामुळे अनेकदा कामामध्ये व्यत्यय येतो. परंतु कार्यालयीन कामे वाहक व चालकांकडून करून घेतली जात असल्याने विहित मुदतीमध्ये विविध प्रकरणातील केसेस मंजुरीसाठी विलंब होत असल्याची ओरड लाभार्थ्यांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)