शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडातून तेलंगणात सागवान तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 21:54 IST

तालुक्यातील मौल्यवान सागवान तसेच इतर वृक्षांची मोठ्या प्रमाणावर कत्तल होत असून शेजारच्या तेलंगणा राज्यात या सागवानाची तस्करी केली जात आहे. याकडे मात्र वनविभागाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देअवैध वृक्षतोड वाढली : मौल्यवान वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : तालुक्यातील मौल्यवान सागवान तसेच इतर वृक्षांची मोठ्या प्रमाणावर कत्तल होत असून शेजारच्या तेलंगणा राज्यात या सागवानाची तस्करी केली जात आहे. याकडे मात्र वनविभागाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.पांढरकवडा तालुका हा चारही बाजूंनी जंगलाने व्यापलेला असून तालुक्यात विपुल वनसंपत्ती आहे. याच तालुक्यात टिपेश्वर अभयारण्यसुद्धा आहे. या जंगलात सागवानासह विविध मौल्यवान वृक्ष आहेत. तेलंगणाच्या सिमेपासूनच काही अंतरावर पांढरकवडा तालुक्यात चारही बाजूंनी जंगलाचा परिसर आहे. तेलंगणाच्या तस्करांचा या वनसंपदेवर डोळा असून या तस्करीला स्थानिकांचा हातभार लागत आहे. तेलंगणातील तस्कर स्थानिकांच्या मदतीने रात्रीच्यावेळी मोठमोठ्या सागवान वृक्षांची कत्तल करतात व रातोरात तेलंगणा राज्यात वाहनाद्वारे हे मौल्यवान लाकुड सिमापार करतात. वाहन सीमापार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाणघेवाण होते. अनेक तस्करांजवळ स्वयंचलित आरामशीन असून या मशीनद्वारे अवघ्या काही मिनीटातच सागवानाचे मोठे झाडही कापल्या जाते. या सागवानाचे तुकडे करून वाहनात भरून त्यावर गौण खनिज अथवा वैरण किंवा बारदाणा टाकतात. त्यानंतर ते तेलंगणा राज्यात नेले जाते. मध्यंतरी काही सागवान तस्करांना पकडण्यातही आले होते. त्यांच्याकडून सागवान मालही जप्त करण्यात आला होता. परंतु नंतर या प्रकरणाचे काय झाले, याबाबत काहीही समजले नाही. अनेकदा हे सागवान तस्कर सागवान तोडीच्या नावाखाली वन्यप्राण्यांची शिकारदेखिल करतात.जंगलात कुणीही फेरफटका मारला असता, सागवान झाडांची कत्तल झाल्याचे दिसून येते. सागवानाची तुटलेली थुटेही दृष्टीस पडतात. परंतु वनविभागाला ही वृक्षतोड दिसत नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सर्रास सुरू आहे. परंतु याकडे वनविभाग लक्ष द्यायला तयार नाही. वृक्षप्रेमी, वन्यप्रेमी म्हणून स्वत:चा उदोउदो करून घेणारेही या वृक्षतोडीबाबत चुप्पी साधून आहे. केवळ वृक्षारोपणाच्या नावाखाली प्रसिद्धी मिळविणाऱ्या या स्वयंघोषित वृक्षप्रेमींनी व वन्यप्रेमींनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.वनउपज तपासणी नाके उरले केवळ नावापुरतेचसागवान तस्करीला आळा बसावा म्हणून वनविभागाने ठिकठिकाणी वनउपज तपासणी नाके उभारले आहेत. परंतु हे नाके केवळ शोभेसाठीच बनले की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. काही अपवाद जर सोडला, तर या नाक्यावर रात्रीच्यावेळी एकही कर्मचारी दिसत नाही. याच संधीचा लाभ हे सागवान तस्कर घेत आहे. एकीकडे शासन वृक्ष लागवडीसाठी विविध योजना अंमलात आणत आहे, तर दुसरीकडे सागवान तस्कर अवैधरितीने मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल करीत आहे. या वृक्षतोडीमुळे मात्र वनसंपदा नष्ट होत आहे.