शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

जमादार, लिपीक व भाजी विक्रेत्यावर ‘ट्रॅप’

By admin | Updated: December 31, 2015 02:43 IST

यवतमाळ पाटबंधारे विभागातील लिपीक आणि पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याचा जमादार व त्याच्या सहकारी भाजी विक्रेत्याला लाचलुचपत विभागाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

‘एसीबी’ची कारवाई : पुसद, यवतमाळात अटक यवतमाळ/पुसद : यवतमाळ पाटबंधारे विभागातील लिपीक आणि पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याचा जमादार व त्याच्या सहकारी भाजी विक्रेत्याला लाचलुचपत विभागाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी यवतमाळ व पुसद येथे करण्यात आली. यवतमाळ पाटबंधारे विभागातील दफ्तर कारकून अजय देवीदासराव देशमुख याला ५०० रुपयांची स्वीकारताना पकडण्यात आले. शेतासाठी वर्धा नदीतून पाणी घेण्यासाठी दीर्घ मुदतीचा करारनामा अर्ज वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी त्याने शेतकऱ्याला लाच मागितली होती. पाटबंधारे कार्यालयासमोरील रस्त्यावर लाच स्वीकारताना त्याला पकडण्यात आले. ही कारवाई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सतीश देशमुख, सहकारी अरुण गिरी, अमीत जोशी, अमोल महल्ले, शैलेश ढोणे, अनिल राजकुमार, नीलेश पखाले, किरण खेडकर, सुधाकर मेश्राम यांनी पार पाडली. अटक टाळून परस्पर जामीन मिळवून देण्याचे सांगून पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याचे जमादार मनोहर हिरासिंग जाधव याने भाजी विक्रेता वसंता राठोड याच्यामार्फत संबंधिताला नऊ हजार रुपयांची लाच मागितली. यानुसार श्रीरामपूर भागातील विद्युत भवन हे स्थळ लाच देण्यासाठी निश्चित करण्यात आले. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जमादार जाधव व भाजी विक्रेत्याला लाच स्वीकारताना पकडले. (लोकमत न्यूज नेटवर्क)