शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक पुलावरून वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 21:55 IST

तालुक्यातील विविध रस्त्यांवर असलेल्या नदी-नाल्यांना ओलांडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पूल बांधले आहे. मात्र त्यामधील काही पूल धोकादायक असूनही त्यावरून वाहतुकीची वर्दळ सुरू आहे. त्यामध्ये पाटाळा, शिरपूर, पेटूर गावाजवळील पूल जीवघेणे ठरत आहेत.

ठळक मुद्देअनेकांचे गेले प्राण : डागडुजीवरच निभावले जात आहे काम

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : तालुक्यातील विविध रस्त्यांवर असलेल्या नदी-नाल्यांना ओलांडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पूल बांधले आहे. मात्र त्यामधील काही पूल धोकादायक असूनही त्यावरून वाहतुकीची वर्दळ सुरू आहे. त्यामध्ये पाटाळा, शिरपूर, पेटूर गावाजवळील पूल जीवघेणे ठरत आहेत.वणी-नागपूर या राज्य मार्गावर पाटाळा गावाजवळ वर्धा नदीवर असलेला पुल सर्वात धोकादायक ठरत आहे. वणीला चंद्रपूर, वर्धा, नागपूर जिल्ह्यांना जोडणारा हा मार्ग असल्याने सर्वाधिक रहदारीचा मार्ग आहे. या मार्गावर पाटाळा गावाजवळ वर्धा नदीवर पुल तयार केला. या पुलाला ५० वर्षापेक्षा अधिक काळ झाला. बांधतानाच हा पुल अरूंद व अतिशय ठेंगणा बांधण्यात आला. त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात किमान चार-पाचवेळा तरी पुराचे पाणी या पुलावरून वाहते. पाण्याच्या वेगवान प्रवाहाने दरवर्षीच या पुलावर खड्डे पडतात. पुल अरूंद असल्याने दोन वाहनांना एकमेकांना ओलांडताना सावधगरीनेच ओलांडावे लागते. पुलावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना वाहन पुलावरून काढणे तारेवरची कसरत ठरते. वारंवार पुर गेल्याने हा पुल कमकुवतसुद्धा झाला आहे. विशेष म्हणजे पुलावरून नेहमी पुराचे पाणी जात असल्याने पुलाच्या कडेला कठडे लावले जात नाही. त्यामुळे वाहनचालकांचे लक्ष जराशेही विचलीत झाल्यास आडकाठी नसल्याने वाहन सरळ नदीत पडू शकते. आतापर्यंत अनेक दोनचाकी व चारचाकी वाहने पुलावरून नदीत पडून अनेकांचे जीव गेले आहेत. मात्र बांधकाम विभागाला याचे गांभीर्य दिसून येत नाही. पुलावरील खड्डे बुजविण्याचे व त्याला कठडे लावण्याचे काम तात्काळ केले जात नाही. आता करंजी-ब्रम्हपुरी हा राष्ट्रीय महामार्ग घोषित झाला आहे. लवकरच त्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारी शेतीचे भूसंपादन करण्यात आले आहे. तयार होणाऱ्या चौपदरी रस्त्याला साजेसा असा रूंद व पुरेशा उंचीचा पुल याठिकाणी तयार होणार काय, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. वणी-कोरपना मार्गावरील शिरपूर गावाजवळ निर्गुडा नदीवर असलेला पुलही कमकुवत व धोकादायक झाल्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या पुलाच्या दोन्ही बाजुस लावली आहे. नुकतीच या पुलाची डागडुजी करण्यात आली आहे. या पुलावरून सिमेंट व कोळसा वाहतूक करणाºया अवजड ट्रकची सतत वाहतूक सुरू असते. त्यामुळे एखादेवेळी मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही वर्षापूर्वी हा पुलसुद्धा नदीच्या पुरात वाहून गेला होता. त्याची पुनरावृत्ती होण्याचीही शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. वणी-मुकूटबन मार्गावर पेटूर गावाजवळ नाल्यावर असलेला पुल तर पावसाळ्यात नेहमीच वाहतुकीला अडथळा ठरत आहे. या पुलाची उंची अतिशय कमी असल्याने साधारण पावसानेही नाल्याचे पाणी या पुलावरून वाहते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक खोळंबून राहते. मागीलवर्षी याच पुलावरून एक युवक पुरात वाहून गेला. या पुलाची उंची वाढविण्याची आवश्यकता आहे.