शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

पोफाळी तलावाचा कायापालट

By admin | Updated: May 16, 2016 02:41 IST

तालुक्यातील पोफाळी येथील तलावाचा कायापालट करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी कंबर कसली असून यात महिलांचेही मोठे योगदान आहे.

दोन लाख लोकवर्गणी : २०० ट्रॅक्टर गाळ काढलाउमरखेड : तालुक्यातील पोफाळी येथील तलावाचा कायापालट करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी कंबर कसली असून यात महिलांचेही मोठे योगदान आहे. तलावाचा कायापालट करण्यासाठी दोन लाख रुपये लोकवर्गणी गोळा झाली असून आतापर्यंत २०० ट्रॅक्टर गाळ उपसण्यात आला आहे.गत १५ दिवसांपासून पोफाळी, जनुना आणि वसंतनगर येथील नागरिकांनी एकत्र येऊन पोफाळी तलावातील गाळ काढण्याचा निर्णय घेतला. त्याला गावकऱ्यांनी सहमती देताच लोकवर्गणीला प्रारंभ झाला. पाहता पाहता दोन लाख रुपये लोकवर्गणी गोळा झाली. दोन जेसीबीच्या मदतीने पोफाळी तलावातील गाळ उपसला जात आहे. आतापर्यंत २०० ट्रॅक्टर गाळ काढण्यात आला आहे. आपसातील सर्व मतभेद बाजूला ठेवून दररोज सकाळी आजूबाजूच्या गावातील नागरिक पोफाळी तलावावर श्रमदानासाठी येत आहे. यात महिलांचाही मोठा सहभाग आहे.जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती विमलताई चव्हाण, पोफाळी ठाणेदार सरदारसिंग ठाकूर, खुशी ठाकूर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश चव्हाण, जनुनाच्या सरपंच रंजना घोंगडे, सावित्री राठोड, रेखाताई कोटूरकर, ज्योती भोजनकर, ताई देडगे यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या आहे. या तलावातील गाळ काढण्यासाठी सतीश नाईक, अ‍ॅड. युवराज देवसरकर, अ‍ॅड. निरंजन पाईकराव, अ‍ॅड. सिद्धार्थ घोंगडे, निरंजन चव्हाण, मनोज जयस्वाल, संजय देशमुख, डॉ. अमोल पुरी, अवधूत देशमुख, शिवाजी कनवाळे, प्रभाकर ठाकरे, सुधाकर जाधव, माधव गुठारे आदींनी पुढाकार घेतला आहे. या तलावातील गाळ काढल्यानंतर आगामी काळात पाणीटंचाईवर मात करण्यास मदत होणार आहे. (शहर प्रतिनिधी)