शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
3
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
4
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
5
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
6
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
9
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
10
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
11
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
12
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
13
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
14
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
15
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
16
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम

रेल्वे दाखविते वाकुल्या

By admin | Updated: November 18, 2014 23:03 IST

झरीजामणी तालुक्यातील सर्वात मोठे गाव मुकुटबन व परिसरातील ग्रामस्थांना गेल्या कित्येक वर्षांपासून रेल्वे वाकुल्या दाखवित आहे. तेथे रेल्वे स्थानक असूनही कोणत्याच गाडीचा थांबा नसल्याने

प्रवाशांची परवड : स्टेशन असूनही थांबा नाही, सर्वच उदासीनवणी : झरीजामणी तालुक्यातील सर्वात मोठे गाव मुकुटबन व परिसरातील ग्रामस्थांना गेल्या कित्येक वर्षांपासून रेल्वे वाकुल्या दाखवित आहे. तेथे रेल्वे स्थानक असूनही कोणत्याच गाडीचा थांबा नसल्याने परिसरातील प्रवाशांचे हाल होत आहे.आदिवासीबहुल झरीजामणी तालुक्यातील मुकुटबन हे सर्वात मोठे गाव आहे़ तालुका ठिकाणापेक्षाही हे गाव मोठे आहे. तेथे दर सोमवारी मोठा आठवडीबाजार भरतो. परिसरातील ग्रामस्थ या बाजारात खरेदीसाठी येतात. व्यापारी व राजकीय दृष्टिकोनातूनही हे गाव महत्वाचे आहे़ या गावाजवळूनच रेल्वे लाईन गेली आहे. त्या रुळांवरून दररोज धडधड करीत नागपूर ते नांदेड ही रेल्वे जाते. मात्र ती तेथे थांबतच नाही. हा परिसर निसर्गरम्य आहे. आता औद्योगिक क्षेत्रही विस्तारत आहे. येत्या काही वर्षांत मोठा सिमेंट प्रकल्प तेथे उभा होत आहे.या गावाला लागून सभोवताल ५० ते ६० च्यावर खेडी आहेत़ परिणामी हे गाव परिसरातील मुख्य गाव म्हणून ओळखले जाते. तेथूनच परिसरातील ग्रामस्थांना पुढील मार्गक्रमण करावे लागते. मात्र तेथे रेल्वे स्टेशन असूनही रेल्वेचा थांबा नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. मुकुटबन येथून नंदीग्र्राम रेल्वे दररोज मुंबई व नागपूरकडे धावते. मात्र ही एक्सप्रेस तेथे थांबत नाही. ती परिसरातील ग्रामस्थांना वाकुल्या दाखवित पुढे निघून जाते. त्यामुळे या रल्वेने प्रवास करावयाचा असल्यास परिसरातील ग्रामस्थांना नागपूर किंवा मुंबईकडे जाण्यासाठी तेथून १२ किलोमीटर अंतरावरील कायर किंवा धानोरा येथील रेल्वे स्टेशन गाठावे लागते. मुकुटबन स्टेशनवर रेल्वे थांबण्यासाठी काही वर्षांपूर्वी रेल्वे स्थानक परिसरात सुविधांची चाचपणी करण्यात आली. त्यावेळी रेल्वे थांबण्याचे संकेत मिळाले होते. मात्र ऐनवेळी माशी कुठे शिंकली, कुणास ठावूक, अद्याप तेथे कोणत्याही रेल्वेला थांबा मिळालाच नाही. परिणामी प्रवाशांना दुसऱ्या रेल्वे स्थानकावर जाऊन प्रवास करावा लागतो. त्याचा प्रवाशांना आर्थिक फटका बसत आहे. सोबतच त्यांचा वेळही वाया जातो. रेल्वे स्थानक असूनही थांबा नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे. (कार्यालय प्रतिनिधी)