शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

तंटामुक्त मोहिमेसंदर्भात प्रशिक्षण कार्यशाळा

By admin | Updated: May 4, 2015 00:08 IST

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेसंदर्भात बुधवारी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा पोलीस मुख्यालयातील कॉन्फरन्स हॉलमध्ये घेण्यात आली.

मूल्यमापनाचे मार्गदर्शन : जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, ठाणेदार, विधी अधिकारी उपस्थित यवतमाळ : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेसंदर्भात बुधवारी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा पोलीस मुख्यालयातील कॉन्फरन्स हॉलमध्ये घेण्यात आली.महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेसंदर्भात जिल्हास्तरीय कार्यकारी समितीच्यावतीने सदर मोहिमेत घोषित तंटामुक्त गावांचे मूल्यमापन कसे करावे, या बाबत यावेळी प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यशाळेत जिल्ह्यातील सोळाही तालुक्यातील मूल्यमापन समित्यांचे सदस्य, सर्व तहसीलदार, ठाणेदार, विधी अधिकारी, पंचायत समिती सभापती व पत्रकार उपस्थित होते. या कार्यशाळेला अपर पोलीस अधीक्षक जे.बी. डाखोरे यांनी मार्गदर्शन करून जिल्ह्यात तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत घोषित तंटामुक्त गावांचे मूल्यमापन कसे करावे, मूल्यमापनात येणाऱ्या अडचणी कशा सोडवाव्यात व शासनाच्या निर्देशाप्रमाणे मूल्यमापन कसे करावे आदींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी मूल्यमापनासंदर्भात सूचनांची माहिती पुस्तिका सर्वांना वितरित करण्यात आली. मूल्यमापनाबाबत समितीतील सदस्यांच्या शंकांचे निरसन यावेळी करण्यात आले. १ ते ५ मे या कालावधीत सर्व घोषित गावांचे जिल्ह्यांतर्गत मूल्यमापन होणार आहे. नागरिकांचे यामध्ये सहकार्य घेण्याच्या सूचना उपस्थितांना देण्यात आल्या. प्रशिक्षण कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी तंटामुक्त कक्षाचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधीक्षक जे.बी. डाखोरे, सहायक पोलीस निरीक्षक बहाकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल नाझिम शेख, शेखर वांढरे व भारती जगताप यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)