शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
4
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
5
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
6
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
7
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
8
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
9
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
10
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
11
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
12
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
13
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
14
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
15
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
16
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
17
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
18
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
19
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
20
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय

ट्रेनरची उपाशापोटी लढाई

By admin | Updated: March 29, 2015 00:08 IST

सूक्ष्म नियोजनाच्या कामात गुंतलेल्या ट्रेनरला उपाशापोटी लढाई लढावी लागत आहे.

पांडुरंग भोयर सोनखाससूक्ष्म नियोजनाच्या कामात गुंतलेल्या ट्रेनरला उपाशापोटी लढाई लढावी लागत आहे. त्यांच्या चहा, नाश्ता आणि जेवणाची सोय केली जात नसल्याने पंचायत सशक्तीकरण कुपोषित झाल्यास नवल वाटू नये. वास्तविक त्यांची ही व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी ग्रामसेवकांवर टाकण्यात आली. मात्र त्यांनी हात वर केले. राजीव गांधी पंचायत सशक्तीकरणांतर्गत सूक्ष्म नियोजन सप्ताह परिसरातील विविध गावात ३१ मार्चपर्यंत राबविला जात आहे. यासाठी ट्रेनरची नियुक्ती करण्यात आली. त्यातील काही बाहेरगावचे आहे. अशाच लोकांचे जेवणासाठी हाल सुरू आहे. ही सर्व मोहीम लोकसहभागातून राबवायची असल्याने अतिरिक्त कुठलीही आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही. गेली २५ मार्चपासून परिसराच्या विविध गावात कार्यरत असलेल्या ट्रेनरला जेवणासाठीही हाल सहन करावे लागत आहे. पिण्याचे पाणीही उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. गावाचा विकास कृती आराखडा, गाव नकाशा तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. मात्र पोटातच अन्न नसल्याने या कामाच्या सक्षमतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. काही ट्रेनरने ही बाब नागरिकांपुढे मांडली. सदर काम लोकसहभागातून होत असले तरी उपाशापोटी राहून काम होणार नाही, याची जाणीव प्रशासनाला असू नये याविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे.गाव पातळीवर काम करणाऱ्या ट्रेनरची चहा, नाश्ता, जेवण आणि निवासाच्या व्यवस्थेची जबाबदारी ग्रामसेवकांवर सोपविण्यात आली आहे. त्यांनी ही जबाबदारी पार पाडायला पाहिजे. - गौतम भगत, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, नेर