शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

वणीमार्गे जनावरांची तस्करी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 21:46 IST

कत्तलीसाठी जनावरांची वणी मार्गे तस्करी सुरूच आहे. नागपूर ते आदिलाबाद मार्गावरील पोलिसांना गुंगारा देत वणीमार्गे जनावरांना ट्रकद्वारे नेण्याचा प्रयत्न शुक्रवारी रात्री उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने उधळून लावला. या कारवाईत ३४ जनावरांना पोलिसांनी जीवदान दिले.

ठळक मुद्दे३४ जनावरांना जीवदान : साडेतेरा लाखांचा मुद्देमाल जप्त, एसडीपीओ पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : कत्तलीसाठी जनावरांची वणी मार्गे तस्करी सुरूच आहे. नागपूर ते आदिलाबाद मार्गावरील पोलिसांना गुंगारा देत वणीमार्गे जनावरांना ट्रकद्वारे नेण्याचा प्रयत्न शुक्रवारी रात्री उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने उधळून लावला. या कारवाईत ३४ जनावरांना पोलिसांनी जीवदान दिले. ट्रकसह एकूण १३ लाख ६० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.जनावरांच्या तस्करीचे मुख्य केंद्र असलेल्या नागपुरातून दररोज शेकडो जनावरांना कत्तलीसाठी तेलंगाणातील आदिलाबाद येथे नेले जात आहे. शुक्रवारी जनावरांनी भरलेला एक ट्रक वणीमार्गे आदिलाबादकडे जाणार असल्याची गोपनिय माहिती वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांना मिळाली. त्यानंतर त्यांच्या विशेष पथकाने वणी शहरालगतच्या चंद्रपूर मार्गावरील टोलनाक्याजवळ शुक्रवारी रात्री सापळा रचला. दरम्यान, नागपूरकडून एक संशयास्पद ट्रक टोलनाक्याजवळ पोहचताच, पोलीस पथकाने त्या ट्रकला अडविले असता, ट्रकचालकाने ट्रकसह पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकातील पोलिसांनी जीव धोक्यात टाकून ट्रकचालकाच्या मुसक्या आवळल्या. ट्रकची तपासणी केली असता, ट्रकमध्ये तब्बल ३४ बैल निर्दयपणे कोंबून असल्याचे आढळून आले. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला. यावेळी ट्रकचालक शेख महेफूस शेख महेबूब (२५) रा.आझादनगर नागपूर व इम्रानखान करीम खान पठाण (३०) रा.नागमंदिर गोधणी रोड नागपूर या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध कलम ११ घ.ड.झ.प्राणीमात्रांना निर्दयपणे वागणूक देणे प्रती कायदा सहकलम ५ अ.ब.प्राणी संरक्षक कायदा व ४२९, ३४ भादंवि ८३, १७७ मोवाका प्रमाणे गुन्हा नोंदवून तपासात घेतला. जनावरांची सुटका करण्यात आल्यानंतर सर्व जनावरांना रासा येथील गुरू गणेश गोशालेत दाखल करण्यात आले. सुटका करण्यात आलेल्या जनावरांची किंमती सहा लाख ६० हजार रुपये आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली नायक पोलीस दिलीप अडकीने पोलीस शिपाई आशिष टेकाडे, रवी ईसनकर, संतोष अण्णा यांनी पार पाडली.पोलिसांच्या कारवाया वाढल्याने मधल्या काळात जनावरांची तस्करी थंडावली होती. मात्र तस्करांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. नागपूर हे जनावरांच्या तस्करीचे मुख्य केंद्र बनले आहे. तेथून आदिलाबादकडे जनावरांना कत्तलीसाठी नेले जाते. नागपूर ते आदिलाबादपर्यंत अनेक पोलीस ठाणी लागतात. परंतु पोलिसांचे सुरक्षा कवच भेदून जनावरांना कत्तलीसाठी नेले जात आहे. तस्करीचे फार मोठे रॅकेट सक्रीय असल्याचे बोलले जाते.