शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणा सीमेवर जनावरांची तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 23:57 IST

मध्यंतरी पोलिसांच्या कारवाया वाढल्याने भूमिगत झालेल्या जनावरांच्या तस्करांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. दोन राज्यांच्या सीमेवरून दररोज शेकडो जनावरे कत्तलीसाठी तेलंगणाकडे नेली जात आहे. गुराख्यांचे सोंग घेऊन ही तस्करी केली जात आहे.

ठळक मुद्देफंडा बदलविला : गुराख्याचे सोंग घेऊन गोधन केले जाते सीमापार

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : मध्यंतरी पोलिसांच्या कारवाया वाढल्याने भूमिगत झालेल्या जनावरांच्या तस्करांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. दोन राज्यांच्या सीमेवरून दररोज शेकडो जनावरे कत्तलीसाठी तेलंगणाकडे नेली जात आहे. गुराख्यांचे सोंग घेऊन ही तस्करी केली जात आहे. या तस्करांना आवर घालण्याचे मोठे आव्हान वणी उपविभागातील पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.काही महिन्यांपूर्वी जनावरे ट्रकमध्ये कोंबून नेली जायची. त्यामुळे अनेकदा या तस्करांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागत होते. तस्करीचे मुख्य केंद्र हे नागपूर असल्याने नागपुरात जनावरांना ट्रकमध्ये कोंबून वणीमार्गे ही जनावरे तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी नेली जायची. परंतु पोलिसांनी तस्करांविरूद्ध कारवाईचा फास आवळल्याने या मार्गाने ट्रकने जनावरे नेण्याचा प्रकार काहीअंशी बंद झाल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी यावर मात करण्यासाठी तस्करांनी नवा फंडा अवलंबविला आहे. झरीच्या जंगलात जनावरे एकत्र करायची. त्यानंतर १० जनावरांच्यामागे एक मजूर लावून त्या जनावरांना चोरट्या जंगल मार्गाने तेलंगणात पोहोचते करायचे. असा नवा फंडा या तस्करांनी अवलंबविला आहे. एक माणुस १० जनावरे घेऊन जात असल्याने तो गुराखीच असावा, असे पाहणाऱ्याला वाटते. त्यामुळे ही तस्करी यशस्वी होऊ लागली आहे. या तस्करीत वणी उपविभागातील अनेक लोक गुंतले असून तेलंगणातील तस्करांशी त्यांचा दैनंदिन व्यवहार असल्याची माहिती एका जाणकाराने ‘लोकमत’ला दिली.रस्त्याने १० जनावरे घेऊन जाणाºया व्यक्तीचा कुणालाच संशय येत नसल्याने तो व्यक्ती ही जनावरे घेऊन सहीसलामत तेलंगणात पोहोचत आहे. तेलंगणातील काही तस्कर एजंटांच्या माध्यमातून सिमेवरील गावातून जनावरांची कमी पैशात खरेदी करून ती कत्तलीसाठी घेऊन जात आहेत.जनावरे हाकत नेणाºया मजुराला रग्गड मजुरी दिली जात असल्याने तोदेखिल निडरपणे तस्करीतील ही जनावरे तेलंगणात पोहोचवित आहे. या धंद्यात दररोज लाखो रूपयांची उलाढाल होत असल्याचे बोलले जाते. झरी तालुक्यातील पाटण येथे पोलीस ठाणे आहे. मात्र पाटण पोलिसांच्या डोळ्यात धूळ झोकून दिवसाढवळ्या ही तस्करी केली जात असल्याची चर्चा आहे. या तस्करीचे तार मारेगावातही जुळले असल्याचे सांगितले जाते. मारेगाव आणि झरी तालुके अगदी जवळ आहेत.चारा टंचाईमुळे ग्रामीण भागात जनावरे विक्रीलायंदा निसर्गाच्या प्रकोपामुळे शेती उत्पादनावर परिणाम झाला. त्यातच पाऊस कमी झाल्याने आगामी काळात चाºयाची टंचाई जाणवू शकते. ही बाब लक्षात घेऊन अनेकांनी आपले गोधन विक्रीला काढले आहे. तस्कर ते गोधन अल्प किमतीत खरेदी करीत आहेत.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ