जागीच मृत्यू : करंजी महामार्ग चौकीसमोरील घटनापांढरकवडा : नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील करंजी पोलीस मदत केंद्रासमोर भरधाव ट्रकने कर्तव्यावरील पोलीस शिपायास चिरडल्याची घटना शनिवारी सकाळी ६.१५ च्या सुमारास घडली. अण्णा ऊर्फ अरविंद बाबाराव चौधरी (३१) असे मृताचे नाव आहे. तो करंजी महामार्ग पोलीस मदत केंद्रात वाहतूक शिपायी म्हणून कार्यरत होता.अरविंद चौधरी हा प्रात:विधीसाठी रस्ता ओलांडून मंगी फाट्याकडे जाताना नागपूरकडून येणाऱ्या के.ए.०१-ए.ई.२१७७ क्रमांकाच्या ट्रकने त्याला चिरडले. त्यात तो जागीच ठार झाला. घटनेनंतर चालक व वाहक ट्रक सोडून पसार झाले. अपघातग्रस्त ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. अरविंद चौधरी चार महिन्यांपूर्वीच यवतमाळातील वडगाव रोड पोलीस ठाण्यातून येथे बदलून आला होता. मूळचा अकोला येथील रहिवासी असलेल्या अरविंदचा गेल्या एप्रिलमध्येच विवाह झाला होता. त्याच्या मागे वृध्द आई-वडील, पत्नी व बराच मोठा आप्त परिवार आहे. पोलीस दलातर्फे मानवंदनाअण्णाच्या पार्थीवाला यवतमाळ येथील पोलीस मुख्यालयात शासकीय इतमामात मानवंदना देण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, निरीक्षक भरत गाडे, सहायक निरीक्षक आनंद पिदूरकर, प्रशांत गिते, संतोष केंद्रे आदींसह पोलीस कर्मचारी व मित्र परिवार उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
वाहतूक शिपायाला भरधाव ट्रकने चिरडले
By admin | Updated: October 23, 2016 01:57 IST