शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

जिल्हाभरातील व्यापाऱ्यांचा बाजारपेठ बंदला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 05:00 IST

सरसकट टाळेबंदीचा निर्णय अन्याय करणारा आहे. सामान्य जनतेला वेठीस धरणारा आहे. यवतमाळ जिल्ह्याची लोकसंख्या ३२ लाख एवढी आहे. गेल्या आठवड्यातील रुग्ण सरासरी ४०० आहेत. तरीसुद्धा आम्ही कठोर निर्बंधांना सामोरे जावे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. व्यापारी, व्यावसायिक, असंघटित क्षेत्रातील लोकांचे गतवर्षात कंबरडे मोडले आहे. या धक्क्यातून सावरतानाच ही दुसरी लाट येत आहे.

ठळक मुद्देसंस्था, संघटनांचे निवेदन : तालुका पातळीवर संताप व्यक्त

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सरसकट लॉकडाऊन रद्द करण्यात यावे, या मागणीचे निवेदन यवतमाळकरतर्फे मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. गतवर्षीच्या लॉकडाऊनमुळे आधीच गाळात रुतलेल्या वर्गाला मरणपंथाला नेणारा निर्णय घेतला गेला आहे. सरसकट टाळेबंदीचा निर्णय अन्याय करणारा आहे. सामान्य जनतेला वेठीस धरणारा आहे. यवतमाळ जिल्ह्याची लोकसंख्या ३२ लाख एवढी आहे. गेल्या आठवड्यातील रुग्ण सरासरी ४०० आहेत. तरीसुद्धा आम्ही कठोर निर्बंधांना सामोरे जावे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. व्यापारी, व्यावसायिक, असंघटित क्षेत्रातील लोकांचे गतवर्षात कंबरडे मोडले आहे. या धक्क्यातून सावरतानाच ही दुसरी लाट येत आहे. सरसकट टाळेबंदीबाबत शुक्रवारपर्यंत सकारात्मक निर्णय न घेतल्यास रस्त्यावर उतरण्याखेरीज पर्याय उरणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे. तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाला कोरोना रुग्णांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या किमतीबाबत निवेदन दिले. रुग्णांच्या तक्रारी संदर्भात (खास औषधांची किंमत, उपलब्धता) एक हेल्पलाईन उघडण्यात यावी, सर्व कोरोना उपचार केंद्रांना मार्गदर्शक सूचनांची आठवण करून द्यावी, अंमल न करणाऱ्यांवर कारवाई करावी आदी मागण्या करण्यासोबतच विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. प्रा. घनश्याम दरणे, प्रशांत बनगीनवार, ॲड. जयसिंह चव्हाण, सैयद सोहराब, आनंद गेडाम, प्रियंका बिडकर, पुष्पलता गिरोलकर आदींनी निवेदन सादर केले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या