शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी उपयोगाचे ट्रॅक्टर पांढरकवडाच्या रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 21:48 IST

नवीन ट्रॅक्टर खरेदी करून त्याची उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी करताना ट्रॅक्टरचा उपयोग शेतीसाठी करणार, अशी नोंदणी केली जाते़ त्यामुळे यासाठी आकारण्यात येणाऱ्या करातून सूट मिळते़. मात्र अनेक व्यावसायिक कृषी वापराच्या नावावर ट्रॅक्टरची उचल करून त्याचा व्यावसायिक कामासाठी वापर करीत असल्याची बाब पुढे आली आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । व्यवसायासाठी केला जातो वापर, दंडाची तरतूद, मात्र संबंधित प्रशासनाकडून तपासणीकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : नवीन ट्रॅक्टर खरेदी करून त्याची उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी करताना ट्रॅक्टरचा उपयोग शेतीसाठी करणार, अशी नोंदणी केली जाते़ त्यामुळे यासाठी आकारण्यात येणाऱ्या करातून सूट मिळते़. मात्र अनेक व्यावसायिक कृषी वापराच्या नावावर ट्रॅक्टरची उचल करून त्याचा व्यावसायिक कामासाठी वापर करीत असल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडत आहे़ पांढरकवडा तालुक्यात असे अनेक ट्रॅक्टर रस्त्यावरून धावत आहेत.शासन शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध योजना राबवित आहे. यासाठी विविध योजनांचा माध्यमातून शेतकऱ्यांना सवलत दिली जात आहे़ याचा शेतकऱ्यांना लाभ होत आहे़ मात्र इतर कृषी योजनांप्रमाणे याही योजनांचा लाभ शेतकऱ्यांच्या नावावर इतर लोक घेत आहेत़ तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांकडे शेती कामासाठी ट्रॅक्टर आहेत, तर काहींनी ट्रॅक्टरची व्यावसायिक कामासाठी उचल केली आहे़नियमानुसार कृषी कामासाठी उचल केलेल्या ट्रॅक्टरचा उपयोग हा कृषीसाठी करणे गरजचे आहे़ या ट्रॅक्टरचा व्यावसायिक कामासाठी उपयोग केल्यास त्यांच्यावर दंड आकारण्याची तरतुद आहे़ शिवाय सदर ट्रॅक्टरची नोंदणीसुध्दा रद्द करण्याची तरतुद आहे़मात्र बºयाच लोकांकडून शेतीचा सातबारा जोडून ट्रॅक्टरची उचल करून त्याचा व्यावसायिक कामासाठी खुलेआम उपयोग होत आहे़ यात कंत्राटदार, बिल्डर आणि रेती माफियांचा सर्वाधिक समावेश आहे़ या प्रकारामुळे शासनाला कर स्वरूपात प्राप्त होणारा लाखो रूपयांचा महसूल बुडत आहे़ हा प्रकार मागील चार ते पाच वर्षापासून सुरू असून याकडे मात्र कुणाचेच लक्ष नाही़ याबाबत चौकशीची मागणी होत आहे.अनेक योजनांत गैरप्रकारशासनाकडून अनेक चांगल्या योजना शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी तयार केल्या जातात. या योजना कार्यान्वित करण्यामागे शासनाचा उद्देश चांगला असतो. मात्र अनेकजण जुगाडू वृत्तीतून अशा योजनांचा लाभ घेऊन शासनाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासतात. यामुळे गरजवंत लाभार्थी योजनेपासून वंचित राहतात. ट्रॅक्टर योजनेचेही नेमके तेच झाले आहे. केवळ शेतीचा सातबारा जोडून कृषी उपयोगासाठी ट्रॅक्टर उचलण्यात आले. मात्र अनेकजण या ट्रॅक्टरचा उपयोग रेती तस्करीसह विविध खासगी व्यवसायासाठी करण्यात येत असल्याचे दिसत आहे.शासनाने कारवाई करण्याची गरजरस्त्यावर धावत असलेल्या ट्रॅक्टरची उचल ही नेमकी कशासाठी केली आहे, ही बाब ट्रॅक्टरच्या कागदपत्रांची पाहणी केल्याशिवाय कळत नाही़ मात्र अशी तपासणी कुणीही करताना दिसत नाही. नेमका याच गोष्टीचा फायदा काही लोक घेत असून कृषीसाठी उचल केलेल्या ट्रॅक्टरचा व्यावसायिक कामासाठी उपयोग करीत आहे़ शिवाय त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याने त्यांना रान मोकळे असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :agricultureशेती