शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
2
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
3
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
4
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
5
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
6
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
9
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
10
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?
11
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
12
कर्नाटकात वाघीण अन् तिच्या ४ बछड्यांचा दुर्दैवी मृत्यू; विष देऊन मारल्याला संशय
13
भाविकांसाठी आनंदवार्ता! आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचं २४ तास दर्शन सुरू
14
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
15
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
16
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
17
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
18
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
19
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
20
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार

तब्बल १० खुनातील मारेकरी मोकाटच

By admin | Updated: June 24, 2015 00:05 IST

गेल्या काही महिन्यात जिल्ह्यात झालेल्या तब्बल दहा खुनांमधील आरोपी मोकाट आहेत.

सुगावाही नाही : अपर अधीक्षक देणार तपासाला दिशा यवतमाळ : गेल्या काही महिन्यात जिल्ह्यात झालेल्या तब्बल दहा खुनांमधील आरोपी मोकाट आहेत. खून का झाला आणि कुणी केला हे शोधण्यात पोलिसांना यश आलेले नाही. आता या खुनांचा तपास करणाऱ्या पथकांना दिशा देण्याची जबाबदारी अपर पोलीस अधीक्षकांवर सोपविण्यात आली आहे. जिल्ह्यात घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातो. अनेकदा पोलीस तपासात गुन्हा उघडकीस आणण्याच्या अगदी जवळ असतात. नेमका त्याच वेळेस त्यांचा कुठेतरी बंदोबस्त लागतो किंवा दुसरी जबाबदारी दिली जाते. त्यामुळे त्यांची लिंक तुटते आणि तपास प्रलंबित पडतो. अशाच कारणांमुळे जिल्ह्यात तब्बल बारा खुनांचे तपास प्रलंबित पडले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी चाबी भरल्यानंतर दोन गुन्हे डिटेक्ट झाले. मात्र अद्यापही दहा खुनातील आरोपी शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. दहा खून झाले, पोलिसांनी गुन्हा दाखल केला, सर्व सोपस्कार झाले, मात्र आरोपी नेमका कोण आणि खून कोणत्या कारणावरून केला हे पोलिसांना शोधता आलेले नाही. वडगाव रोड, यवतमाळ शहर, महागाव, शिरपूर, कळंब, पुसद शहर, आर्णी, लाडखेड, यवतमाळ ग्रामीण या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या या घटना आहेत. महागाव तालुक्यात दोन खून असून त्यातील एक घटना तर सन २०१३ पासूनची आहे. अन्य घटनाही सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ झालेल्या आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी खुनाच्या या फाईली पुन्हा उघडल्या आहेत. तपास पथकांना या डिटेक्शनसाठी अवधी निश्चित करून दिला आहे. वरिष्ठांच्या अनुभवाचा फायदा व्हावा म्हणून तपास पथकांना डिटेक्शनच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्याची, दिशा दाखविण्याची जबाबदारी अपर पोलीस अधीक्षक काकासाहेब डोळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडेही खुनासह अन्य काही गुन्ह्यांच्या समांतर तपासाची जबाबदारी आहे. त्यात आता संबंधित पोलीस ठाण्याची यंत्रणा यशस्वी होते की, स्थानिक गुन्हे शाखा आपली डिटेक्शनमधील कामगिरी दाखविते याकडे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)पुजाऱ्याच्या खुनाचे तार ठाणे जिल्ह्यातलाडखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोखी येथील मंदिराच्या पुजाऱ्याचा सुमारे सहा महिन्यांपूर्वी खून करण्यात आला होता. खून नेमका कोणत्या कारणावरून झाला हे स्पष्ट नाही. मात्र पोलिसांनी पुजाऱ्याच्या या खुनावर लक्ष केंद्रीत केले आहे. तपास पथकाला त्याचे धागेदोरे ठाणे जिल्ह्यात गवसल्याची माहिती आहे. या अनुषंगाने एक पथक लवकरच संशयितांच्या शोधार्थ ठाण्याला जाणार असल्याचे पोलीस वर्तुळातून कळते.