शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

वणीत परिचारिकेचे वाहनातून अपहरण करून अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 05:00 IST

पिडित युवती मंगळवारी रात्री ड्युटी आटोपून पायदळ घराकडे परत जात असताना वणीतील महाराष्ट्र बँक चौकात मागाहून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या टाटा इंडिका कारच्या चालकाने तिला सुगम हॉस्पीटल कुठे आहे, अशी विचारणा केली. त्यावर पिडितेने त्याला सुगमकडे जाण्याचा मार्ग सांगितला. मात्र तुम्ही पायदळ त्याच मार्गाने जात असाल तर गाडीत बसा. मला हॉस्पिटल दाखवा, असे सांगून कार चालकाने पिडितेला गाडीत बसविले.

ठळक मुद्देबायपासवरील घटना : हॉस्पिटलचा पत्ता विचारण्याचा बहाना

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : येथील एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या युवतीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घटना मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली.याप्रकरणी वणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. पिडित युवती मंगळवारी रात्री ड्युटी आटोपून पायदळ घराकडे परत जात असताना वणीतील महाराष्ट्र बँक चौकात मागाहून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या टाटा इंडिका कारच्या चालकाने तिला सुगम हॉस्पीटल कुठे आहे, अशी विचारणा केली. त्यावर पिडितेने त्याला सुगमकडे जाण्याचा मार्ग सांगितला. मात्र तुम्ही पायदळ त्याच मार्गाने जात असाल तर गाडीत बसा. मला हॉस्पिटल दाखवा, असे सांगून कार चालकाने पिडितेला गाडीत बसविले. पिडिता वाहनात मागील सीटवर बसताच, चालकाने कारचे काच बंद करून साईमंदिर चौकातून, नांदेपेरा मार्गाने कार वळविली.यवतमाळ बायपासवर पोहचल्यानंतर यवतमाळ मार्गाने पुढे १० किलोमिटर पुढे जाऊन एका निर्जनस्थळी कार थांबविली. पिडितेला जीवे मारण्याची धमकी देऊन कारमध्येच तिच्यावर अत्याचार केला. यावेळी त्याने तिचा मोबाईलदेखील हिसकावून घेतला. त्यानंतर पुन्हा त्याने कार वणीकडे वळविली. नांदेपेरा मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगवर आणून तिला सोडून दिले व तो कार घेऊन पळून गेला.याप्रकरणी पिडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि ३६६, ३७६ (१), ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागला नसून त्याचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Rapeबलात्कार