शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडा हद्दवाढ त्रासदायक

By admin | Updated: March 11, 2017 01:05 IST

मोठा गाजावाजा करुन येथील नगर परिषदेच्या हद्दीत समाविष्ठ झालेल्या वसाहतींची दुर्दशा अद्यापही संपली नाही.

नगर परिषदेचे दुर्लक्ष : समस्यांमध्ये पडली भर, नागरिक हैराण पांढरकवडा : मोठा गाजावाजा करुन येथील नगर परिषदेच्या हद्दीत समाविष्ठ झालेल्या वसाहतींची दुर्दशा अद्यापही संपली नाही. हद्दवाढ झाल्यानंतर या वसाहतींची दुर्दशा संपेल, या वसाहतींना ‘अच्छे दिन’ येतील, अशी अपेक्षा होती. परंतु अद्यापही या वसाहतीला पाहिजे त्या प्रमाणात सुविधाच पुरविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. गेल्या अडीच वर्षांपूर्वी शहराला लागून असलेल्या मंगलमूर्ती ले-आऊट, बेतवार ले-आऊट, पटेल ले-आऊट, श्यामनगरी-२, पोसवाल ले-आऊट, आशियाना ले-आऊट, राधेयनगरी, जंगूबाई टेकडी परिसर, रामकृष्णनगर, चिंतामणी ले-आऊट आदि परिसर नगरपरिषदेच्या प्रभाग क्र.१ व प्रभाग क्र.२ मध्ये समाविष्ठ करण्यात आला. हा भाग नगरपरिषदेच्या क्षेत्रात आल्यामुळे मतदारांची संख्याही वाढली. त्यामुळे नगरपरिषदेचे दोन नविन सदस्य निवडून देण्यासाठी एप्रिल २०१५ मध्ये निवडणूकसुद्धा झाली. या निवडणुकीत नगरपरिषदेतील सत्तारुढ कॉग्रेसचे मंजुषा तिरपुडे व विशाल सिडाम हे दोन सदस्य निवडून आलेत. या दोन जागांसाठी निवडणूक होऊन दोन वर्षे होत आहेत. तरी नगर परिषद हद्दीत समाविष्ठ झालेल्या या भागाचा विकास अद्यापही झाला नाही. अनेक वसाहतीत अद्यापही पथदिवे लावण्यात आलेले नाहीत.रस्त्याची कामे झाली नाहीत. या सर्व परिसरातील नाल्या तुंबलेल्या अवस्थेत आहेत. या नाल्यांची नियमित साफ सफाई केल्या जात नाही. नगर परिषदेचे तत्कालिन अध्यक्ष शंकर बडे यांनी मंत्रालयात सतत पाठपुरावा करुन पांढरकवडा नगर परिषदेची हद्दवाढ करुन घेतली होती. त्यांनी यासाठी महाराष्ट्र राज्याचे तत्कालिन मंत्री शिवाजीराव मोघे यांची मदत घेतली. नगर विकास मंत्रालयाकडे सतत पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन शासनाने पांढरकवडा नगरपरिषदेला हद्दवाढीची परवानगी दिली. रितसर हा भाग नगरपरिषद क्षेत्रात समाविष्ठ करण्यात आला. वाढीव क्षेत्रासाठी दोन सदस्य संख्याही वाढली. १७ सदस्यांची असलेली पांढरकवडा नगरपरिषद १९ सदस्यांची झाली. त्यानंतर शंकर बडे यांचा अडीच वर्षांचा नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला. नगराध्यक्ष पद हे पुढील अडीच वर्षांसाठी महिला सदस्यासाठी राखीव असल्यामुळे ३० जून २०१५ रोजी वंदना रॉय या नगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्यात. या कालावधीत पुलाखालून बरेच पाणी वाहुन गेले.नगर परिषदेला पुर्ण वेळ अभियंताच नव्हता. कोणाचा पायपोस कोणाला नाही,अशी या नगर परिषदेची स्थिती झाली. विकासाची कामे खोळंबली. या वसाहतींचा विकास न झाल्याने तीव्र असंतोष पसरला आहे. (तालुका प्रतिनिधी) घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात विशेष म्हणजे या वसाहतीतील नागरिकांकडून नगर परिषदेने लाखो रुपयांचा कर देखील वसूल केला आहे.परंतु या ठिकाणी साधी पाणी पुरवठ्याची सोय सुध्दा करण्यात आलेली नाही.पाणी पुरवठा करण्यासाठी पाईप लाईनच टाकण्यात आलेली नाही.काही भागात पाईप लाईन टाकण्यात आली परंतु ती पाईप लाईन तशीच पडून असल्यामुळे हे काम अर्धवट अवस्थेत आहे.या प्रभागामध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे.मात्र याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. यामुळे परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.