शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

उद्या प्रचार तोफा थंडावणार

By admin | Updated: February 14, 2017 01:41 IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार अखेरच्या चरणात आला आहे.

चुरस वाढली : विजयाची आस साऱ्यांनाच वणी : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार अखेरच्या चरणात आला आहे. वणी तालुक्यातील चार गट आणि आठ गणांसाठी होणाऱ्या या निवडणुकाच्या जाहीर प्रचाराच्या तोफा मंगळवारी रात्री १२ वाजतानंतर थंडावणार आहे. प्रचारासाठी अवघे काही तास उरले असल्याने गट आणि गणातील उमेदवारांनी प्रचाराचा जोर वाढविला आहे. आपणच विजयी होऊ, असा दावा प्रत्येकच उमेदवार राजकीय गणित मांडून करीत आहेत. भाजपाचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, कॉंग्रेसचे माजी आमदार वामनराव कासावार, शिवसेनेचे माजी आमदार तथा जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर हे स्वत: या निवडणुकीच्या विजयासाठी परिश्रम घेत आहेत. या नेत्यांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी या निवडणुकीला अतिशय महत्व दिल्याचे दिसून येत असून हे नेते आपल्या प्रत्येक उमेदवारांसोबत प्रचारासाठी फिरत असल्याचे वणी विधानसभा मतदार संघात पहायला मिळत आहे. मागील विधानसभा निवडणुकीत वणी विधानसभा मतदार संघात भाजपाच्या तिकीटावर संजीवरेड्डी बोदकुरवार आमदार म्हणून निवडून आलेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वणी विधानसभा मतदार संघातील जिल्हा परिषद गट व गणातील उमेदवार निवडून आणण्यासाठी ते अहोरात्र मेहनत घेत असल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी नोटाबंदीची झळ सोसणारा ग्रामीण मतदार ऐनवेळी कोणती भूमिका घेतो, यावर भाजपाच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. वणी शहर वगळता वणी विधानसभा मतदार संघातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिवसेना आणि कॉंग्रेसचे प्राबल्य आहे. त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थाही भाजपाच्या ताब्यात याव्यात, यासाठी पक्षपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. असे असले तरी शिवसेना व कॉंग्रेसचे प्राबल्य हटविण्यात भाजपाला या निवडणुकीत यश येईल का, हे पाहणे आता मनोरंजक ठरणार आहे. एकूणच सर्वपक्षिय नेते, कार्यकर्ते निवडणुकीच्या कामात गुंतले असल्याचे दिसून येत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आढावा बैठकजिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंह यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वणीत रविवारी आढावा बैैठक घेतली. निवडणुकीच्या तयारी पूर्णतेचा आढावा घेऊन पोलीस पाटील व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. पोलीस पाटलांवर गाव पातळीवरील प्रत्येक माहिती देण्याची जबाबदारी सोपवून कायदा व सुव्यवस्थेसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा प्रतिनिधी असल्याची जाणिव करून देऊन ही जबाबदारी पूर्ण करण्यास असमर्थ ठरल्यास संबंधिताना टर्मिनेट होऊ शकता, असा इशारा दिला. बैैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, शिरपूर, मुकुटबन, पाटण पोलीस ठाण्याचे ठाणेदार, गटविकास अधिकारी खेरे, मुख्याधिकारी दीपक इंगोले, अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील व केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित होते.