पुसद : रामनवमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील पुसद येथे विशाल शोभायात्रा आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त शहरात राहणार असल्याची माहिती शहर शांतता समितीच्या सभेत देण्यात आली. शहर पोलीस ठाण्याच्यावतीने गुरुवारी रामनवमीनिमित्त सभा पोलीस ठाण्यात घेण्यात आली. अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी चंद्रकांत जाजू होते. तर अपर पोलीस अधीक्षक जानकीराम डाखोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अश्विनी पाटील, तहसीलदार भगवान कांबळे आदींची उपस्थिती होती.या सभेत रामनवमी जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष विश्वास भवरे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करून सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त राहणार असल्याची माहिती ठाणेदार रमेश सोनोने यांनी दिली. सभेला लक्ष्मणराव जाधव, भीमराव कांबळे, जयवंत पाटील, शरद पाटील, विनोद जिल्हेवार, अॅड.उमाकांत पापीनवार, परमेश्वर जयस्वाल, गिरीश अग्रवाल, बंडू राऊत, ताहेर खान पठाण, सैयद इस्त्याक, तहसीन पहेलवान, सुनीता तगडपल्लेवार, राहुल देशमुख, धनंजय अत्रे, संतोष मुकेश, देवीदास डोळस, राधेश्याम जांगीड, विश्वास भवरे, प्रा.सुरेश गोफणे आदींसह अनेकांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
पुसद येथे तगडा पोलीस बंदोबस्त
By admin | Updated: March 27, 2015 01:43 IST