शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
2
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
3
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
4
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
5
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
6
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
7
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
8
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
9
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
10
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
11
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
12
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
13
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
14
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
15
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
18
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
19
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
20
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

वाघापूरमध्ये शिवसेनेला गाठण्यासाठी इतर एकत्र

By admin | Updated: July 22, 2015 00:22 IST

वाघापूर ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी शिवसेनेला गाठण्यासाठी काँग्रेस सोबतच सर्वच पक्षांनी आघाडी केली आहे. येथे शिवसेना आणि काँग्रेस ...

यवतमाळ : वाघापूर ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी शिवसेनेला गाठण्यासाठी काँग्रेस सोबतच सर्वच पक्षांनी आघाडी केली आहे. येथे शिवसेना आणि काँग्रेस सर्वाधिक सदस्य संख्या असलेले पक्ष राहीला आहे. आता शिवसेनेचे जिल्हा प्रमुख येथे असल्याने शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. वाघापूर शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी काँग्रेस नेहमीच अग्रेसर राहिली आहे. येथील बरोबरीच्या सामन्यात नेहमीच भाजप अथवा अपक्षाने आपले हित साधून घेतले आहे. याही वेळेसची स्थिती अशीच आहे. केवळ वॉर्ड क्रमांक सहामध्ये बहुजनांच्या गठ्ठा मतावर अनेक समीकरण अवलंबून आहेत. येथे समता पॅनल आणि काँग्रेसचे वाघापूर परिवर्तन विकास आघाडी अशी लढत होत आहे. या वॉर्डात काँग्रेसची धुरा जितेंद्र ढाणके यांच्याकडे आहे. वॉर्ड क्रमांक चार आणि पाचमध्ये काँग्रेसचे प्राबल्य राहिले आहेत. वॉर्ड क्रमांक एक आणि दोनमध्ये शिवसेना वरचढ ठरली आहे. शिवाय भाजपच्या एकमेव उमेदवाराने वॉर्ड पाचमध्ये स्वत:ची छाप सोडली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वात लढत असलेल्या वाघापूर परिवर्तन विकास आघाडी आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष ढवळे यांचे जनसेवा पॅनल यात थेट लढत आहे. काँग्रेसकडून जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळसाहेब मांगुळकर यांनी व्यूहरचना केली आहे. यात कोण सरस ठरतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. नुकतेच शिवसेनेच्या जिल्हा नेतृत्वाची जबाबदारी वाघापूरला मिळाली आहे. त्यामुळे येथील निवडणूक जिल्हास्तरावर महत्वाची ठरणार आहे. वाघापूर टेकडी आणि कोलाम पोड परिसरासह शिवाजी चौक हा भाग वॉर्ड क्रमांक चारमध्ये येतो. वॉर्ड दोनमध्ये सावित्रीबाई फुले सोसायटी परिसर, वॉर्ड क्रमांक एकमध्ये संभाजीनगर, पटवारी कॉलनी, रेणूका नगरी, भारतनगर हा परिसर आहे. वॉर्ड तीनमध्ये पंचशीलनगर, बनकर ले-आऊट, वॉर्ड पाचमध्ये बोरुंदीयानगर, सुवर्णनगर, चितळकर ले-आऊट परिसर, वॉर्ड सहा मध्ये माधवनगर, रंभाजीनगर हा परिसर येतो. वाघापूर मध्ये काही भागात अजूनही पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहेत. सांडपाण्याच्या नाल्या, स्मशानभूमीचा प्रश्न येथे आहे. यासर्व समस्यांचा निपटारा कसा करणार याचे उत्तर मतदारांना द्यावे लागणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)