शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

‘वसंत’च्या उमरखेड गटातील तीन जागांसाठी आज मतदान

By admin | Updated: April 24, 2016 02:39 IST

वसंत सहकारी साखर कारखान्याची १९ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. सर्वपक्षीय नेत्यांनी मिळून निवडणूक अविरोध होण्यासाठी प्रयत्न केले.

१६ जागा अविरोध : नेत्यांच्या विरोधात पुकारला ‘एल्गार’उमरखेड : वसंत सहकारी साखर कारखान्याची १९ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. सर्वपक्षीय नेत्यांनी मिळून निवडणूक अविरोध होण्यासाठी प्रयत्न केले. त्यात १६ जागा अविरोध करण्यात यश आले. परंतु उमरखेड गटातील तीन जागांसाठी चार उमेदवार उभे राहिल्याने २४ एप्रिलला मतदान घेतले जाणार आहे. वसंत सहकारी साखर कारखाना येथील निवडणूक लागली आहे. त्यात सहकार क्षेत्रातील सर्वच नेत्यांनी आपापली ताकद दाखवित उमेदवार अर्ज भरले. २४६ उमेदवारी अर्ज आल्याने निवडणुकीत चुरस वाढली. परंतु वसंत कारखान्याची आर्थिक स्थिती अतिशय डबघाईस आली असल्याने सर्वपक्षीय नेत्यांनी निवडणूक अविरोध करण्यासाठी सहमती दर्शविली. त्यात वसंतराव नाईक शेतकरी पॅनल तयार करण्यात आले आणि १९ जागांसाठी उमेदवारी दिली. इतर सर्वांनी आपले उमेदवारी अर्ज परत घेण्यास सांगण्यात आले. त्याप्रमाणे इतर सर्वच उमेदवारांनी अर्ज परत घेतले. परंतु उमरखेड गटातील तीन जागांसाठी चार उमेदवारी अर्ज राहिले. डॉ.अनिल कनवाळे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे पाच तालुक्यातून मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. नाईक पॅनलचे चितांगराव कदम, नानाराव चव्हाण, विलास मोरे हे तिघे आपले नशीब आजमावत असून या तिघांच्या विरोधात अनिल कनवाळे यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. सर्वपक्षीय नेत्यांच्या विरोधात एल्गार पुकारून त्यांनी उमेदवारी कायम ठेवली, अशी प्रतिक्रिया मतदारांमध्ये उमटत आहे. केवळ एका उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्याने निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया करावी लागणार आहे. (शहर प्रतिनिधी)