शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 22:22 IST

मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवार, १९ जुलै रोजी आदरांजली सभा, शैक्षणिक साहित्य वितरण आणि भजन व भावगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमान्यवरांची उपस्थिती: आदरांजली सभा, शैक्षणिक साहित्य वितरण, भजन व भावगीत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवार, १९ जुलै रोजी आदरांजली सभा, शैक्षणिक साहित्य वितरण आणि भजन व भावगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या सहचारिणी मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवार, १९ जुलै रोजी सकाळी ९.३० ते १०.३० या वेळात आदरांजली सभेचे आयोजन स्थानिक प्रेरणास्थळ येथील मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या समाधीस्थळी करण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता नगरपरिषद शाळांमधील वर्ग १ ते ५ च्या सर्व एक हजार २०० विद्यार्थ्यांना जवाहरलाल दर्डा फाऊंडेशनच्यावतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण केले जाणार आहे. मातोश्री दर्डा सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा राहणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून लोकमतचे एडिटर-इन-चीफ तथा राज्याचे माजी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष माधुरीताई आडे, यवतमाळच्या नगराध्यक्ष कांचनताई चौधरी, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, नगरपरिषद शिक्षण सभापती नीता केळापुरे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिलकुमार अढागळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर, नगरपरिषद शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी योगेश डाफ उपस्थित राहणार आहेत.सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळात मातोश्री दर्डा सभागृहात वीणादेवी दर्डा यांच्या स्मृतिदिनानिमित्त भजन व भावगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात अमोलकचंद महाविद्यालयाचे संगीत विभाग प्रमुख तथा प्रसिद्ध गायक प्रा.डॉ.राहुल एकबोटे आणि त्यांचा संच गीत गायन करतील. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जवाहरलाल दर्डा फाऊंडेशन व लोकमत परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.