शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

आज चोख बंदोबस्त, २२० पोलीस तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 21:38 IST

लोकसभेच्या मतमोजणी प्रक्रियेनंतर कुठलीही परिस्थिती उद्भवल्यास हाताळण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. मतमोजणी केंद्र परिसराला अगदी चिलखती संरक्षण दिले आहे. हा परिसर पूर्णत: प्रवेश निशिद्ध ठेवण्यात आला आहे. एकूण २२० पोलीस अधिकारी कर्मचारी कायदा व सुव्यवस्थेसाठी तैनात केले आहे.

ठळक मुद्देयवतमाळातील संवेदनशील चौकांवर पोलिसांचा ‘वॉच’, सहा कॅमेरामन, एक झुमर व्हॅन टिपणार हालचाली

यवतमाळ : लोकसभेच्या मतमोजणी प्रक्रियेनंतर कुठलीही परिस्थिती उद्भवल्यास हाताळण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे. मतमोजणी केंद्र परिसराला अगदी चिलखती संरक्षण दिले आहे. हा परिसर पूर्णत: प्रवेश निशिद्ध ठेवण्यात आला आहे. एकूण २२० पोलीस अधिकारी कर्मचारी कायदा व सुव्यवस्थेसाठी तैनात केले आहे.दारव्हा मार्गावरील शासकीय गोदाम परिसरात १५० कर्मचारी, १५ पोलीस अधिकारी, दोन चार्ली पथक, एक अ‍ॅन्ट गँगचे पथक, दहा वाहतूक शिपाई व तीन अधिकारी तैनात केले आहे. याशिवाय शहरातील सर्व महत्त्वाच्या चौकांमध्ये बंदोबस्त लावण्यात आला आहे. शारदा चौक, शनि मंदिर चौक, बसस्थानक चौक, दत्त चौक, आर्णी नाका, स्टॅट बँक चौक, लोहारा चौक येथे एक अधिकारी व पाच कर्मचारी निकाल लागेपर्यंत बंदोबस्ताला ठेवण्यात आले आहे.मतमोजणी केंद्र परिसरासह शहरातील हालचाली टिपण्यासाठी पोलिसांनी सहा कॅमेरा मन व एक झुमर व्हॅन दिमतीला घेतली आहे. एकंदरच मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावी, निकालानंतर विजयी पक्षाकडून होणारा जल्लोष आणि विरोधकाची नाराजी यातून संघर्ष होवू नये यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे.यवतमाळ शहर पोलीस ठाणे व अवधूतवाडी पोलिस ठाण्यातील कर्मचारी, अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखा व मुख्यालयातील राखीव पोलीस शिपाई व अधिकारी या बंदोबस्तासाठी तैनात केलेआहे.राजकीय नेत्यांच्या घरांनाही संरक्षणशहरातील सर्वच पक्षातील महत्त्वाच्या राजकीय नेत्यांच्या घरापुढे पोलीस बंदोबस्त ठेवण्यता येणार आहे. तसेच लोकसभेतील उमेदवारांच्या घरांनाही संरक्षण दिले जात आहे. याशिवाय जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९